Rajasthan Assembly Elections Results : राजस्थानमध्ये अशोक गेहलोत यांचा पराभव का झाला? ही आहेत ५ मोठी कारणं

Rajasthan Assembly Election 2023 Result in Marathi : राजस्थानमध्ये काँग्रेसचा मोठा पराभव होताना दिसतोय...
PM Modi, Ashok Gehlot
PM Modi, Ashok GehlotSarkarnama
Published on
Updated on

Rajasthan Assembly Elections Results in Marathi : राजस्थान विधानसभा निवडणूक 2023 च्या एक्झिट पोलमध्ये राज्यात पुन्हा काँग्रेसच सरकार येईल, असा मोठा अंदाज व्यक्त करण्यात आला होता, पण राजस्थानमधील जनतेने एक्झिट पोलचा अंदाज आणि काँग्रेसचा दावा निकाली काढत भाजपच्या पारड्यात कौल दिल्याचे चित्र आहे. काँग्रेसचे जादूगर म्हणवणारे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची जादू या निवडणुकीत चालताना दिसली नाही. भाजप ५ वर्षांनी पुन्हा सत्तेत परतली. या निवडणुकीत अशोक गेहलोत यांचा अर्थातच काँग्रेसचा पराभव कुठल्या कारणांनी झाला? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याची काही कारणे आता समोर आली आहेत.

राजस्थान निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेपर लीक, लाल डायरी, भ्रष्टाचार, मोदींची हमी, महिलांवरील गुन्हे आणि कायदा सुव्यवस्थेचे मुद्दे प्रामुख्याने मांडले, तर अशोक गेहलोत सरकारने निवडणुकीच्या वर्षात एकामागून एक चाली खेळल्या. आरोग्य विम्याची मर्यादा ५० लाख करण्याची हमी, स्वस्त दरात सिलिंडरसारखी आश्वासने पेपर लीक, लाल डायरी आणि भ्रष्टाचाराचे आरोप, यांसह अल्पसंख्याकांच्या बाजूने झुकलेले धोरण आणि विकासाकडे झालेले दुर्लक्ष काँग्रेसला महागात पडले.

PM Modi, Ashok Gehlot
Rajasthan Assembly Results 2023 : गेहलोत-पायलट वादानं अर्धे काम केलं...; मोदींनी शेवटचा घाव घातला !

पेपर लीक प्रकरण

पंतप्रधान मोदींनी राजस्थान निवडणुकीत पेपर लीक प्रकरणाचा मुद्दा उचलला होता. भाजप सरकार आल्यानंतर जे काही घोटाळे झालेत, त्यांची चौकशी करून दोषींची रवानगी तुरुंगात करू, असे पंतप्रधान मोदी म्हणाले होते. अशोक गेहलोत हे स्वतःला जादूगर म्हणतात, पण आपल्या जादूने त्यांनी राजस्थानमध्ये भ्रष्टाचाराचे मायाजाल पसरवले आहे. पेपर लीक प्रकरण तर साधारण बाब झाली आहे. याला राजकीय संरक्षण मिळाले आहे. मोठ-मोठ्या कोचिंग संस्थांवर छापे टाकल्यास मुख्यमंत्र्यांच्या अनेक निकटवर्तीयांची नावे समोर येतील, असा आरोप पंतप्रधान मोदींनी केला होता. ( Rajasthan Results in Marathi )

लाल डायरी प्रकरण

राजस्थानमध्ये लाल डायरीचा मुद्दा नवीन नाही. बऱ्याच कालावधीपासून हा मुद्दा चर्चेत आहे, पण पंतप्रधान मोदींनी निवडणुकीच्या प्रचारात हा मुद्दा जोरदार लावून धरला. राजस्थान सरकारमधून बरखास्त करण्यात आलेले मंत्री राजेंद्र गुढा यांनी लाल डायरीत आमदारांच्या घोडेबाजाराचा लेखाजोखा असल्याचेही म्हटले होते. लाल डायरीची पाने उघड होत आहेत, तसा जादूगरच्या चेहऱ्यावरील रंग उडत चालला आहे. काँग्रेस सरकारने गेल्या ५ वर्षांत जल, जंगल आणि जमीन कशी विकली? राज्यात अवैध उत्खननाशी कुणाचा संबंध आहे? हे सर्व लाल डायरीत असल्याचा आरोप पंतप्रधान मोदींनी केला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अंतर्गत कलह

या शिवाय राजस्थानमध्ये काँग्रेस पक्षात अंतर्गत कलह हा टोकाला गेला होता. मुख्यमंत्री गहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील गटबाजी चव्हाट्यावर आली होती. याचा परिणाम काँग्रेस कार्यकर्त्यांवर झाला आणि जनतेतही चुकीचा संदेश गेला. निवडणुकीपूर्वीच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी दोन्ही नेत्यांमध्ये मनोमिलन घडवून आणण्याचा प्रयत्न केला. आम्ही एकसाथ असल्याचा संदेशही दिला, पण त्याचा निवडणुकीत फारसा उपयोग झाला नसल्याचे दिसून आले.

कन्हय्यालाल हत्याकांड

राजस्थानमध्ये सर्वाधिक चर्चेत ठरलेला मुद्दा म्हणजे कन्हय्यालाल हत्याकांड प्रकरण. भाजपने निवडणुकीच्या प्रचारात कन्हय्यालाल हत्याकांड प्रकरणाचा मुद्दा मोठ्या प्रमाणात लावून धरला. कन्हय्यालाल हत्याकांडावरून भाजपने राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले होते. यावर जाळ्यातही अशोक गेहलोत अडकले.

विकासाकडे दुर्लक्ष आणि बोकाळलेला भ्रष्टाचार

अशोक गेहलोत यांच्या काळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाला. या भ्रष्टाचारामुळे काँग्रेस सरकारचे विकासाकडे दुर्लक्ष झाले. नवीन रस्तेही राज्यात बांधले गेले नाहीत. विकास न केल्याने इतर राज्यांमध्ये उद्योग, व्यवसाय करणाऱ्यांच्या राजस्थानमधील नागरिकांचा काँग्रेस सरकारवर रोष होता. याशिवाय अल्पसंख्याकांच्या बाजूने काँग्रेसचे झुकलेले धोरण राहिल्याने इतर सामाजात सरकारविरोधात नाराजी वाढली होती. यासोबतच निवडणुकीच्या काळात ईडीची झालेली एन्ट्री. राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंह डोटासरा यांच्यापासून ते उमेदवार ओमप्रकाश हुडला यांच्या घरावर पेपर लीकप्रकरणी ईडीने छापे टाकले होते. ईडीच्या छाप्यांचा मुद्दा काँग्रेसने निवडणुकीच्या प्रचारात मांडला, पण याचा फायदा भाजपला होताना दिसतोय.

PM Modi, Ashok Gehlot
Assembly Elections Results 2023 : मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये भाजपची मुसंडी; छत्तीसगड काँग्रेसने राखले, तेलंगणात केसीआर यांना बायबाय

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com