Governor Haribhau Bagade : 'बलात्कार करणाऱ्या नराधमांना नपुंसक करा, तरच' राज्यपाल हरीभाऊ बागडे भडकले, शिवरायांचाही केला उल्लेख

Governor Haribhau Bagde On Women abuse : राज्यासह देशा सध्या महिलांची छेडछाड, अत्याचाराच्या घटनेत वाढ होताना दिसत असून चिंताही व्यक्त केली जातेय. यावरून राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी मोठे विधान केलं असून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख देखील केला आहे.
Governor Haribhau Bagade
Governor Haribhau Bagadesarkarnama
Published on
Updated on

Pune News : राज्यात गेल्या काही दिवसांपासून महिला अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात तरूणीवर बलात्काराची घटना ताजी असतानाच बीडमध्ये पोलिसानेच तरूणीवर अत्याचार केला. त्यापाठोपाठ पुण्यात तरूणाने दारूच्या नशेत लघूशंका करत धिंगाना घातला. तशीच घटना नागपुरमध्ये देखील समोर आली. तरूणीच्या समोरच एकाने लघूशंका केल्याचा किळसवाना प्रकास उघडकीस आला. यामुळे आता पुन्हा एकदा राज्यासह देशात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याचा पार्श्वभूमीवर राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी मोठं विधान करताना, महिलांची छेड काढणाऱ्यांना थेट चोप आणि बलात्कार करणाऱ्या नराधमांना नपुंसक केले पाहिजे, असे म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्याची सध्या राजस्थानपासून महाराष्ट्रापर्यंत चर्चा होताना दिसत आहे.

देशात चिंता वाढणाऱ्या अनेक घटना सध्या घडत असून महिलांची छेड आणि दुष्कृत्यांच्या घटनेत वाढ होत आहे. यावरून महिला वर्गात चिंतेचे मळभ पसरले आहे. या पार्श्वभूमीवर हरिभाऊ बागडे यांनी, महिलांच्याबाबतीत घडणाऱ्या अशा घटना कमी करायच्या असतील तर मनातच भीती निर्माण करायला हवी. यासाठी महिलांची छेड काढणाऱ्यांना थेट चोप आणि बलात्कार करणाऱ्या नराधमांना नपुंसक केलं पाहिजे असे म्हटलं आहे. ते राजस्थानमधील भरतपूर येथे जिल्हा बार असोसिएशनच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा देखील उल्लेख केल्याने आता त्यांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे.

यावेळी हरिभाऊ बागडे म्हणाले की, आमच्या राज्यात (महाराष्ट्रात) जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज होते. तेंव्हा असे वर्तन करणाऱ्याला थेट दंड केला जात असे. त्याबाबत शिवाजी महाराजांचे सक्त आदेश होते. अत्याचार करणाऱ्याला जीवे न मारता त्याचे हात-पाय तिथल्या तिथे तोडा असे आदेश त्यांचे होते. त्यामुळे मरेपर्यंत त्याला त्याच्या कृत्याची आठवण राहत होती. अशाच प्रकारची शिक्षा एका पाटीलला दिली होती, असेही बागडे यांनी शिवरायांचा किस्सा सांगितला.

Governor Haribhau Bagade
Governor Haribhau Bagde : राजस्थानच्या राजभवनात बागडेनानांचा मराठी बाणा..

तसेच यावेळी हरिभाऊ बागडे मोबाईलवर व्हिडिओ बनवणाऱ्यावर आगपाखड करताना, काही लोक महिलांवर अत्याचार होत असतानाही व्हिडिओ बनवत असतात. जे योग्य नाही. आपल्या समोर अशी घटना होत असले तर त्याला पकडा. एकटे आहात म्हणून मागे हटू नका. समोर या आणखी 2-4 लोक मदतीला येतील. जोपर्यंत विनयभंग करणाऱ्याला आपण चोप देत नाही तोपर्यंत अशा गुन्ह्यांना आळा बसणार नाही, असेही हरिभाऊ बागडे म्हणाले.

Governor Haribhau Bagade
Governor Haribhau Bagde News : भाजपमध्ये पोस्टर अन् जाहिरातबाजी करून उमेदवारी मिळत नाही..

सध्या आपल्या देशात 12 वर्षांखालील मुलीवर लैंगिक अत्याचार किंवा विनयभंग केला तर फाशीची तरतूद आहे. पण तरीही अशा घटना थांबत नाहीत. गुन्हेगारांना कायद्याचा धाक नसल्याचे अशा घटना घडत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. तर अशा नराधमांमध्ये धाक निर्माण करायचा असेल तर कायद्याच्या भीतीसाठी काय करावे, याचा आता तुम्हीच विचार करा असेही हरिभाऊ बागडे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com