IPS Officer News: पोलिस प्रशासन हादरलं..! एका दिवसाच्या सुट्टीवर गेलेले आयपीएस अधिकारी तब्बल साडेतीन महिन्यांनंतरही बेपत्ता; घातपाताचा संशय...

Rajasthan Police News: राजस्थान पोलिस दलातील वरिष्ठ आयपीएस अधिकारी काळूराम रावत हे गेल्या सुमारे साडेतीन महिन्यांपासून अचानक बेपत्ता झाले आहेत.या घटनेमुळ पोलिस प्रशासनात खळबळ उडाली आहे.
Rajasthan ips .jpg
Rajasthan ips .jpgSarkarnama
Published on
Updated on

Rajasthan News: महाराष्ट्रासह देशभरात गुन्हेगारीच्या घटना रोज दिवसागणिक वाढत आहे. या वाढत्या गुन्हेगारीच्या घटना रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून कठोर पावलेही उचलली जात आहे. पण तरीही पोलिसांना पूर्णपणे गुन्हेगारी रोखण्यात पूर्णपणे अपयश आल्याचं दिसून येत आहे. कारण राजस्थान पोलीस दलातून एक हादरवणारी घटना समोर आली आहे.

राजस्थान पोलिस दलातील वरिष्ठ आयपीएस अधिकारी काळूराम रावत हे गेल्या सुमारे साडेतीन महिन्यांपासून अचानक बेपत्ता झाले आहेत.या घटनेमुळ पोलिस प्रशासनात खळबळ उडाली आहे. त्यांनी 12 जानेवारी रोजी ताप आल्यानं ड्युटीवर येऊ शकत नसल्याचं कारण देत एका दिवसाची सुट्टी घेतली होती. पण आयपीएस अधिकारी असलेले रावत आज जवळपास साडे तीन महिने पूर्ण झाले असतानाही ड्युटीवर परतलेच नसल्याची माहिती हाती आली आहे.

काळूराम रावत हे राजस्थान पोलिस दलात भ्रष्टाचार प्रतिबंधक ब्युरोमध्ये कार्यरत असल्याचं समोर येत आहे. त्यांनी 12 जानेवारी रोजी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना व्हॉट्सअॅपवर मेसेज करत एक दिवसाची रजा मागितली होती. यावेळी त्यांच्या तब्येतीचं कारण दिलं होतं.पण त्यानंतर रावत यांनी आजतागायत ड्युटीवर जॉईन केलेली नाही. यामुळे ते कुठे आहेत,सुरक्षित आहेत ना,त्यांच्यासोबत कोण कोण आहे, असे एक ना विविध प्रश्न केल्यानंतर घातपाताचाही संशय व्यक्त केला जात आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे राजस्थानमधील आयपीएस अधिकारी काळूराम रावत हे बैपत्ता झाल्याच्या कालावधीत त्यांचं प्रमोशन,बदली असं दोन्हीही झाल्याची माहिती समोर येत आहे. ते ना जुन्या ठिकाणी हजर झाले ना त्यांनी बदली झालेल्या ठिकाणचा कार्यभार स्वीकारला नसल्याचं समोर येत आहे.

Rajasthan ips .jpg
CM Fadnavis Order : महाराष्ट्र सुन्न! चिमुरडीच्या निर्घृण हत्येनंतर मुख्यमंत्र्यांचा आक्रमक निर्णय; पोलीस प्रशासनाला दिले 'हे' कडक आदेश

याप्रकरणानं पोलिस विभागाचे धाबे दणाणले आहेत. रावत यांच्याशी कोणताही संपर्क होऊ शकलेला नाही, त्यांचा मोबाईल फोनही सतत स्विच ऑफ, कव्हेरज क्षेत्राच्या बाहेर असल्याचं येत आहे. राजस्थान पोलिसांनी पुढचं पाऊल उचलताना रावत यांचा मागावार शोध पथके तयार केली असून विविध ठिकाणी त्यांचा शोध घेतला जात आहे.ते त्यांच्या स्वेच्छेने कोठे गेले आहेत की याचा तपास पोलिसांकडून सध्या सुरू आहे.

राजस्थान केडरचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी असलेले काळूराम रावत हे यांचा पोलिस प्रशासन सेवेचा अनुभव दांडगा आहे. त्यांनी विविध जिल्ह्यांमध्ये पोलीस अधीक्षक म्हणून यशस्वी जबाबदारी सांभाळली आहे.ते सध्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात महत्त्वाच्या पदावर कार्यरत होते.

Rajasthan ips .jpg
Shivsena BJP Politics: शिवसेना-भाजप युती 2029 ला तुटणार? फडणवीस सरकारमधील मंत्र्यांचा दावा; महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com