CM Fadnavis Order : महाराष्ट्र सुन्न! चिमुरडीच्या निर्घृण हत्येनंतर मुख्यमंत्र्यांचा आक्रमक निर्णय; पोलीस प्रशासनाला दिले 'हे' कडक आदेश

child abuse and murder case pune region news : चिमुरडीच्या निर्घृण हत्येनंतर महाराष्ट्र हादरला असून मुख्यमंत्र्यांनी पोलीस प्रशासनाला कडक आदेश दिले आहेत. गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे संकेत.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील घटनेनंतर राज्यभरातून संतापाची लाट उसळली आहे. साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर 65 वर्षांच्या आरोपीने अत्याचार करून तिची निर्दयी हत्या केल्याची घटना समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये तीव्र संताप आणि दु:ख व्यक्त होत आहे. या अमानुष कृत्यामुळे समाजमन सुन्न झाले असून पीडित कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने पोलीस यंत्रणेला कठोर निर्देश दिले आहेत. आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्या पूर्वीच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचाही तपास सुरू आहे. या घटनेतील प्रत्येक बाब बारकाईने तपासून दोषीला कठोरात कठोर शिक्षा मिळवून देण्याचा निर्धार सरकारने व्यक्त केला आहे.

Devendra Fadnavis
Criminal history : 'राक्षस नाही, तर 'सैतान' आहे हा आरोपी; चिमुरडीचा बळी घेणाऱ्या गुन्हेगाराचा थरकाप उडवणारा भूतकाळ!

मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, हे प्रकरण फास्टट्रॅक न्यायालयात चालवण्यासाठी राज्य सरकार न्यायालयाकडे विशेष विनंती करणार आहे. अशा गुन्ह्यांना कोणतीही माफी नाही आणि आरोपीला शक्य तितक्या कमी वेळात मृत्यूदंडाची शिक्षा व्हावी, यासाठी सरकार प्रयत्नशील राहील, असे त्यांनी सांगितले. तसेच पुणे ग्रामीण पोलीस अधिकाऱ्यांना तपासात कोणतीही ढिलाई न ठेवता जलद कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान, या घटनेनंतर विरोधकांनी राज्यातील महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, अशा संवेदनशील प्रकरणांमध्ये राजकारण करणे योग्य नाही. प्रत्येक घटनेकडे मानवतेच्या दृष्टीने पाहणे आवश्यक आहे. सरकार आपली जबाबदारी ओळखून सर्व आवश्यक ती पावले उचलत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Devendra Fadnavis
Pune Metro : पुणेकरांच्या नशिबी पुन्हा 'तारीख पे तारीख'; मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतरही हिंजवडी मेट्रोला आता नवा मुहूर्त!

या घटनेच्या निषेधार्थ नसरापूर परिसरात कडकडीत बंद पाळण्यात आला. गावकऱ्यांनी शांततेत मुका मोर्चा काढत आपल्या भावना व्यक्त केल्या. प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले असले तरी परिसरात तणावपूर्ण शांतता कायम आहे. गावकऱ्यांचे प्रतिनिधीमंडळ लवकरच मुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांची भेट घेणार असून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, हीच सर्वांची मागणी आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com