Shivsena BJP Politics: शिवसेना-भाजप युती 2029 ला तुटणार? फडणवीस सरकारमधील मंत्र्यांचा मोठा दावा; महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

Maharashtra Politics: 'विधानसभा निवडणुकीच्या वेळी एका जागेसाठी शिवसेना-भाजपची युती तुटली होती, याची आठवण संजय शिरसाट यांनी करून दिली. राजकारणात बाँन्ड किंवा अ‍ॅग्रिमेंट असे काही नसते? प्रत्येक पक्ष हा आपापल्या परीने पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतो,असंही शिवसेनेच्या नेत्यानं म्हटलं आहे.
eknath shinde Devendra Fadnavis
eknath shinde Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Shivsena News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राज्यसभा खासदार व नेते संजय राऊत यांनी 'सामना'तील अग्रलेखातून शिवसेना-भाजप दोन्ही पक्षावर टीका करताना ते 2029 मध्ये स्वबळावर निवडणूक लढू शकतात? असे भाकीत केले आहे. यावर शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी खरमरीत उत्तर दिले आहे. हो 2029 मध्ये भाजप स्वबळावर लढू शकते का? तर हो, शिवसेना स्वबळावर लढू शकते का? तर हो लढू शकते, असे सांगत राजकारणात काहीही होऊ शकते.

विधानसभा निवडणुकीच्या वेळी एका जागेसाठी शिवसेना-भाजपची युती तुटली होती, याची आठवण संजय शिरसाट यांनी करून दिली. राजकारणात बाँन्ड किंवा अ‍ॅग्रिमेंट असे काही नसते? प्रत्येक पक्ष हा आपापल्या परीने पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतो. त्यात गैर काहीही नाही, त्यामुळे जशी स्वबळावर लढण्याची तयारी भाजपा करते, तशी ती शिवसेनाही करते.

पण त्यामुळे 'उबाठा' राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेसला सोबत घेत पुन्हा महाविकास आघाडी होईल, आणि आपला नेता पुन्हा मुख्यमंत्री होईल, या स्वप्नात कोणी राहू नये, असा टोलाही संजय शिरसाट यांनी संजय राऊत व उद्धव ठाकरे यांना लगावला. छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शिरसाट बोलत होते.

प्रत्येक पक्ष हा आपापल्या पद्धतीने तयारी करत असतो. 29 ला भाजप स्वबळावर लढणार का? शिवसेना लढू शकते का? तर का नाही. राजकारणामध्ये असं कोणतंही अ‍ॅग्रिमेंट नसते, की येणारी निवडणूक आता आपण अशी लढणार आहोत, तशी लढणार आहोत.

eknath shinde Devendra Fadnavis
Vineet Singh Arrest : 'मी संविधान मानत नाही'; सोशल मीडियावर वारंवार पोस्ट, पोलिसांनी दाखवला कायद्याचा हिसका!

एका जागेसाठी शिवसेना- भाजपची युती तुटताना आपण पाहिलेली आहे. म्हणून त्यांनी तयारी करणं इतर पक्षांनी तयार करणे याच्यात काहीही गैर नाही आणि त्यांनी तयारी केली म्हणून तुम्हाला त्यांनी थांबवलंय का?

म्हणून आम्ही आमच्या पद्धतीने, सगळे पक्ष आपापल्या पद्धतीने स्वबळाची तयारी करत असतो. पण कुणाला असं वाटत असेल की काँग्रेस आणि राष्ट्रवादी त्यांच्या बरोबरच राहणार आहे आणि पुन्हा त्यांच्या नेत्याला ते मुख्यमंत्री करणार आहेत, तर ते स्वप्नात आहेत. म्हणून स्वप्न पाहण्यापेक्षा वास्तवाला समोर गेलं पाहिजे.

eknath shinde Devendra Fadnavis
Koregaon Politic's : शंभूराज देसाई 11 दिवसांत दुसऱ्यांदा कोरेगावात; राजाभाऊ बर्गेंना ताकद देत महेश शिंदेंना सुनावले

येणारं कोणतंही संकट किंवा आव्हान असेल ते स्वीकारण्याची ताकद ही शिवसेनेत आहे. आणि म्हणून आम्ही कोण काय करतं? यापेक्षा आमचा पक्ष आम्ही कसा पुढे घेऊन जायचा याची चिंता करत असतो, असा चिमटाही शिरसाट यांनी यावेळी काढला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com