Political News : दोन बायका, आठ मुलं असलेल्या मंत्र्यांचा अजब सल्ला; म्हणाले, ‘खूप मुलं जन्माला घाला, मोदी...’

Babulal Kharadi : बाबूलाल खराडी हे राजस्थान सरकारमध्ये मंत्री...
PM Narendra Modi, Babulal Kharadi
PM Narendra Modi, Babulal Kharadisarkarnama
Published on
Updated on

Rajasthan News : मुलं किती असावीत, यावरून काही जण अनेकदा अजब सल्ले देत असतात. असाच एक सल्ला दोन बायका आणि आठ मुलं असलेल्या मंत्र्यांनी दिला आहे. तुम्ही खूप मुलं जन्माला घाला. चिंता करण्याची गरज नाही. सर्वांना पंतप्रधान नरेंद्र मोदी घर देतील, स्वस्तात गॅसही मिळेल, असे हे मंत्री म्हणाले आहेत.

राजस्थानमधील (Rajasthan) उदयपूर जिल्ह्यातील झाडोल विधानसभा (Assembly) मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे बाबूलाल खराडी (Babulal Kharadi) यांनी हा सल्ला दिला आहे. ते चौथ्यांदा आमदार झाले असून सध्या राजस्थान सरकारमध्ये कॅबिनेटमंत्री आहेत. खराडी यांचे विधान चर्चेत आहे. कारण त्यांची दोन लग्ने झाली असून पहिल्या पत्नीचे नाव तेजूदेवी आणि दुसऱ्या पत्नीचे नाव मणीदेवी आहे. त्यांना आठ मुलं आहेत. आदिवासी परंपरेनुसार त्यांनी दोन विवाह केले आहेत.

PM Narendra Modi, Babulal Kharadi
MLA Disqualification Result : निकालानंतर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

विकसित भारत संकल्पयात्रेमध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांनी मंगळवारी लाभार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी भाजपचे (BJP) इतर स्थानिक आमदार व पदाधिकारीही उपस्थित होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, तुम्ही खूप मुलं जन्माला घाला. पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) घर देतील. कोणीही घराशिवाय राहू नये, असे पंतप्रधानांचे स्वप्न आहे. मग त्रासच होणार नाही. तुम्हाला माहिती आहे की, पंतप्रधान देशाला पुढे नेऊ इच्छितात.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

खराडी यांच्या या विधानावर उपस्थित लोकांनीही जोरदार टाळ्या वाजवल्या. त्यांच्या या विधानाचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. दरम्यान, खराडी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. याआधी ते 2003 आणि 2008 मध्येही निवडणूक जिंकले आहेत. 2013 मध्ये मोदीलाटेत मात्र ते निवडणुकीत पराभूत झाले आहेत. पण त्यानंतर पुन्हा सलग दोनदा आमदार झाले. भाजप सरकारमध्ये ते कॅबिनेटमंत्री आहेत.

R...

PM Narendra Modi, Babulal Kharadi
NCP News : मजबूत पक्षाला अजित पवार गटाने दिला धक्का, माजी नगराध्यक्षासह...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com