NCP News : मजबूत पक्षाला अजित पवार गटाने दिला धक्का, माजी नगराध्यक्षासह...

Hasan mushrif : गडहिंग्लजच्या माजी नगराध्यक्षाने अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याने पक्षाची ताकद आणखी वाढली आहे.
Hasan mushrif, Ajit Pawar
Hasan mushrif, Ajit Pawarsarkarnama
Published on
Updated on

Kolhapur : सत्तेत आल्यानंतर राष्ट्रवादी (अजित पवार गट) आपला पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी पक्षप्रवेश घडवून आणत आहेत. पश्चिम महाराष्ट्रात या पक्षाची तुलनेने जास्त ताकद आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत देखील पश्चिम महाराष्ट्रात अजित पवार गटाला चांगले मतदान झाले होते. त्यामुळे दिवसेंदिवस या पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत आहेत. गडहिंग्लजमध्ये मजबूत असणाऱ्या जनता दलातील महत्त्वाचे नेते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत.

गडहिंग्लज येथील जनता दलाचे माजी नगराध्यक्ष बसवराज खणगावे, माजी उपनगराध्यक्ष नरेंद्र भद्रापूर व उदय पाटील या तिघांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश निश्चित झाला आहे. त्यामुळे शहरातील जनता दलाला मोठा हादरा बसला आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये आज (बुधवारी) हा प्रवेश होणार असल्याचेही सांगण्यात आले.

Hasan mushrif, Ajit Pawar
MLA Disqualification Result : निकालानंतर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

शहरातील विनोद बिलावर, अॅड. सतीश इटी यांच्यासह करंबळीचे भाजप सरपंच अनुप पाटील यांचाही प्रवेश असल्याचे खणगावे यांनी सांगितले. गेल्या वेळच्या सभागृहात स्वाती कोरी यांच्या नेतृत्वाखालील जनता दल पालिकेत सत्तेवर होते. सभागृहाची मुदत संपण्यापूर्वीपासून या पक्षात अंतर्गत धुसफूस सुरू होती. अनेक वेळा त्यात दुरुस्तीचा प्रयत्नही झाला. परंतु त्यात यश आले नाही. सभागृहाची मुदत संपल्यानंतरही दोन वर्षाच्या कालावधीत खणगावे मनापासून पक्षात कार्यरत नव्हते. दरम्यान, या कालावधीत खणगावे यांच्यासह पाटील यांचीही राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्याशी जवळीकता वाढत होती.

गोडसाखर निवडणुकीत उदय पाटील यांनी तर उघडपणे मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील आघाडीचा प्रचार केला होता. मित्रत्वाच्या नात्याने भद्रापूर यांची खासदार संजय मंडलिक यांच्याशी जवळीकता पूर्वीपासूनच आहे. सहा महिन्यांपासून या तिघांचाही राष्ट्रवादी प्रवेश होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. त्यावर आता शिक्कामोर्तब झाला आहे. मुश्रीफ यांचा फोन येताच मंगळवारी (ता. 9) सायंकाळी मुंबईकडे रवाना झाल्याचे भद्रापूर यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश करणार असल्याचेही ते म्हणाले

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

इतर राजकीय पक्षांमध्ये कितीही उलथापालथ झाली तरी जनता दलातील एकजूट मात्र प्रत्येकवेळी जमेची बाजू ठरली आहे. याच एकजुटीच्या बळावर दिवंगत श्रीपतराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखालील जनता दलाने अनेक वर्षे पालिकेवर झेंडा फडकविला आहे. आता सलग तीन ते पाचवेळा नगरसेवकपदी निवडून येणाऱ्या प्रमुख कार्यकर्त्यांच्याच या निर्णयाने जनता दलातील एकजुटीला तडा गेला असून पक्षाला हा मोठा धक्का मानला जात आहे.

(Edited By Roshan More)

Hasan mushrif, Ajit Pawar
MLA Disqualification Result: निकालाआधीच नार्वेकरांचं मोठं विधान; म्हणाले, 'निकालातून सर्वांना...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com