महसूल मंत्र्यांना हनीट्रॅपमध्ये अडकविण्याचा डाव, मॅाडेलचा आत्महत्येचा प्रयत्न

दीपाली हिने या मॉडेलला ब्रेक देण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी उदयपूरमध्ये पंधरा दिवस चित्रिकरण सुरु होते.
महसूल मंत्र्यांना हनीट्रॅपमध्ये अडकविण्याचा डाव, मॅाडेलचा आत्महत्येचा प्रयत्न
sarkarnama
Published on
Updated on

जयपूर : जोधपूर येथे काही दिवसापूर्वी एका मॅाडेलने हॉटेलच्या सातव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. चौकशीदरम्यान राजस्थानच्या महसूल मंत्री रामलाल जाट (Ramlal Jat) यांना हनीट्रॅपमध्ये (sex scandal) अडकविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. यातील आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

जोधपूरमध्ये हॉटेल लॉडर्समध्ये ही घटना घडली. रामलाल जाट यांना हनीट्र्र्रॅपमध्ये अडकविण्याचा आरोपींचा डाव होता. ''मी शेतकऱ्यांचा नेता असल्याने मला फसविण्याचा हा प्रयत्न केला आहे,'' असे रामलाल जाट यांनी माध्यमांना सांगितले. याप्रकरणी दीपाली आणि अक्षत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपाली आणि अक्षत यांनी एक वादग्रस्त व्हिडिओ देखील बनविला होता.

महसूल मंत्र्यांना हनीट्रॅपमध्ये अडकविण्याचा डाव, मॅाडेलचा आत्महत्येचा प्रयत्न
मंदिर, मस्जिद, गुरुद्वारानंतर आधी रोटी-रोजगाराचं बोला!

या मॉडेलला मंत्री जाट यांच्या एका जनसुनवाई कार्यक्रमात पाठविण्यात आले होते. त्यानंतर तिने मंत्र्यांना स्वतंत्र्यपणे भेटावे यासाठी आग्रह सुरू केला. परंतु, त्यांनी नकार दिला. दीपाली हिने या मॉडेलला ब्रेक देण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी उदयपूरमध्ये पंधरा दिवस चित्रिकरण सुरु होते.

महसूल मंत्र्यांना हनीट्रॅपमध्ये अडकविण्याचा डाव, मॅाडेलचा आत्महत्येचा प्रयत्न
ममता बॅनर्जी हाजिर हो ; राष्ट्रगीत अवमानप्रकरणी न्यायालयाकडून समन्स

दीपाली हिने भीलवाड़ाच्या सर्कीट हाऊसमध्ये रामलाल जाट यांना भेटायला गेली होती. त्यांना काही कागदपत्रे दाखविली. त्यांनी स्पष्ट सांगितले की या कागदपत्रांचा विषय त्यांच्या अखत्यारीत येत नाही. यावर दीपालीने त्यांना एका मुलीला भेटण्याची ऑफर दिली. या मॉडेलला एका हॉटेलात थांबविण्यात आले होते. तेथे मंत्र्यांना येण्यासाठी आग्रह करण्यात येत होता.

जोधपुरचे पोलिस उपायुक्त भुवन भूषण यांनी सांगितले की आरोपी दीपिका आणि यांनी या मॉडेल का एक वादग्रस्त व्हिडिओ केला होता. त्यानुसार तिला ते ब्लैकमेल करीत होते. तिच्या माध्ममातून रामलाल जाट यांना फसविण्याची त्याची योजना होती. या व्हिडिओच्या माध्यमातून आरोपी त्या मॉडेलवर दबाव टाकत होते. मंत्री रामलाल जाट याच्याशी जवळीक साधण्यासाठी ते तिच्यावर दबाब टाकत होते. या मॅाडेलने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यानंतर आरोपींचा डाव फसला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com