Ambadas Danve : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नुकतीच ठाणे महानगरपालिकेच्या माजी विरोधीपक्ष नेत्या शानू पठाण यांच्या निवासस्थानी भेट दिली. या भेटीदरम्यान दोघांमध्ये सुमारे दोन तास चर्चा झाली. या चर्चेत शानू पठाण यांनी आपण इंडिया आघाडीचे प्रवक्ते तथा आमदार डाॅ. जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्ह्यात महाविकास आघाडीला बळ मिळवून देऊ, या शब्दात दानवे यांना आश्वस्त केले.
दरम्यान, ही भेट सद्यस्थितीत आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांना शिवसेना शिंदे आणि राष्ट्रवादी अजित पवार या गटाने घेरण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर असल्याचे बोलले जात आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे नुकतेच ठाणे दौऱ्यावर आले होते. त्यावेळी दानवे यांनी शानू पठाण यांच्या निवासस्थानी भेट दिली.
याप्रसंगी शानू पठाण, मर्झिया पठाण यांना सामाजिक तथा राजकीय विषयांवर अंबादास दानवे यांनी मार्गदर्शन केले. तर, ठाणे जिल्ह्यातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांबाबत झालेल्या चर्चेत, ठाणे जिल्ह्यात महाविकास आघाडीला लोकप्रियता लाभत आहे. ठाणे जिल्ह्यात डाॅ. जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व कार्यकर्ते महाविकास आघाडीला प्रचंड यश संपादन करून देऊ, असे शानू पठाण यांनी दानवे यांना सांगितले.
(Edited by Amol Sutar)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.