Arvind Kejriwal News : दिल्लीतील मतदान होताच केजरीवाल सुप्रीम कोर्टात; काय आहे कारण?

Delhi Liquor Scam Case : लोकसभा निवडणुकीत प्रचारासाठी कोर्टाने केजरीवालांना अंतरिम जामीन दिला आहे. त्यांना दोन जूनला पुन्हा जेलमध्ये जावे लागणार आहे.
Arvind Kejriwal, Supreme Court
Arvind Kejriwal, Supreme CourtSarkarnama
Published on
Updated on

New Delhi Political News : दिल्लीतील लोकसभा निवडणुकीचे सात जागांवरील मतदान झाल्यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal News) यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. अंतरिम जामीनाची मुदत आणखी सात दिवसांनी वाढवावी, अशी मागणी करणारी याचिका केजरीवालांकडून दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे आता कोर्टाकडून काय निर्णय घेतला जाणार, याकडे लक्ष लागले आहे. (Delhi Liquor Scam Case)

दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणी ईडीने (ED) केजरीवालांना 21 मार्चला अटक कऱण्यात आली होती. त्याननंतर त्यांना 10 मेला सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) अंतरिम जामीन दिला. ते जवळपास 51 दिवस जेलमध्ये होते. लोकसभा निवडणुकीत (Lok sabha Election 2024) प्रचारासाठी कोर्टाने जामीन दिला आहे. त्यानंतर केजरीवालांना दोन जूनला पुन्हा जेलमध्ये जावे लागणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यातील मतदान एक जूनला आहे. (Latest Political News)

Arvind Kejriwal, Supreme Court
Yogi Adityanath News : योगींनी ‘यमराज’लाही आणलं निवडणुकीच्या प्रचारात

सात किलो वजन झाले कमी

तिहार जेलमध्ये सात किलो वजन कमी झाले असल्याचा दावा केजरीवालांनी केला आहे. जामीन मिळाल्यानंतर आरोग्य तपासणी केली जात असून किटोन लेव्हल वाढल्याचे समोर आले आहे. डॉक्टरांनी  PET-CT स्कॅन करण्यास सांगितले आहे. त्यासाठी अंतरिम जामीनाची मुदत सात दिवसांनी वाढवावी, अशी विनंती केजरीवालांनी याचिकेत केली आहे. (Latest Marathi News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अटकेवर अद्याप निकाल नाही

केजरीवालांची अटक बेकायदेशीर असल्याची याचिका कोर्टासमोर प्रलंबित आहे. ईडीजवळ अटक करण्यासाठी पुरेसा आधार नाही. केवळ संशयावरून त्यांना अटक केली आहे. पीएमएलए कायद्यातील कलम 19 नुसार करण्यात आलेली अटक केवळ संशयावरून करण्यात आली आहे. त्यामुळे ही अटक बेकायदेशीर आहे, असा दावा केजरीवालांकडून कोर्टात करण्यात आला आहे.

केजरीवालांच्या याचिकेवरील सुनावणी पूर्ण झाली असून कोर्टाने निकाल राखून ठेवला आहे. दरम्यान, केजरीलांच्या जामीननंतर वाद निर्माण झाला होता. सुप्रीम कोर्टाने त्यांना स्पेशल ट्रीटमेंट दिल्याचा दावा भाजप नेत्यांकडून करण्यात आला होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही याबाबत भाष्य केले होते. त्यामुळे आता केजरीवालांना पुन्हा जामीनाची मुदत वाढवून दिली जाणार का, हे लवकरच समजेल.

Arvind Kejriwal, Supreme Court
Amit Shah News : समान नागरी कायद्याबाबत अमित शाहांनी केलं मोठं विधान; म्हणाले, पुढील पाच वर्षांत...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com