
Jaypur News : लोकसभेची रंगीत तालीम म्हणून पाहिले गेलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल नुकताच जाहीर झाला. राजस्थान, मध्य प्रदेश,छत्तीसगडमध्ये भाजपने दणदणीत विजय मिळवला तर तेलंगणामध्ये बीरआरएसला झटका देत काँग्रेसने जोरदार कमबॅक केले. तसेच राजस्थानमध्ये भाजपने गेहलोत सरकारला धोबीपछाड दिला. पण आता याच राजस्थानमधून मोठी खळबळजनक घटना समोर येत आहे.
राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची गोळ्या झाडून हत्या प्रकरण समोर आलं आहे. ही घटना राजस्थानची ( Rajasthan News ) राजधानी असलेल्या जयपूरमध्ये मंगळवारी दुपारी घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. हल्लेखोरांनी गोगामेडींवर एकूण चार गोळ्या झाडल्या. या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला आहे.
राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची त्यांच्य राहत्या घरी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. हल्लेखोरांनी गोगामेडी यांच्यावर चार गोळ्या झाडल्या.या हल्ल्यानंतर त्यांना तात्काळ मेट्रो रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचाराच्या आधीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.पोलिसांकडून हल्लेखोरांचा कसून शोध घेतला जात आहे.(Crime News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुखदेव सिंह गोगामेडी (Sukhdev Singh Gogamedi ) हे त्यांच्या शामा नगर जनपथ येथील घराबाहेर उभे होते. त्याचवेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. गोळीबाराचा आवाज ऐकून गोगामेडी यांच्या शेजारी राहणाऱ्या लोकांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली. हल्ला झाला तेव्हा गोगामेडी यांच्याबरोबर घरात उपस्थित असलेले अजित सिंह हेही हल्ल्यात गोळी लागून गंभीर जखमी झाले आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पोलिसांना हल्लेखोरांची माहिती मिळाली आहे. हल्लेखोरांच्या मागावर गेलेल्या पोलीस आणि हल्लेखोरांमध्ये चकमक झाली.या चकमकीत नवीन सिंह शेखावत या हल्लेखोराचा मृत्यू झाला आहे. हा हल्लेखोर जयपूरच्या शाहपुरा येथे राहत असल्याची माहिती जयपूर पोलीस आयुक्त बी. जी. जॉर्ज जोसेफ यांनी दिली आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.