Manoj Jarange Patil:'...तोपर्यंत घराचा उंबरा शिवणार नाही'; 2 जानेवारीनंतर मुंबईत धडकणार मराठ्यांचे वादळ

Maratha Reservation: मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला २ जानेवारीपर्यंतची डेडलाइन दिली.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilSarkarnama
Published on
Updated on

Jalna News: मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटीत उपोषण करून राज्य सरकारला धारेवर धरणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी नऊ दिवसांपासून सुरू असलेले उपोषण गुरुवारी सायंकाळी मागे घेतले. मात्र, उपोषण मागे घेताना काही अटी घालत राज्य सरकारला अल्टिमेटम देत चांगलेच जेरीस आणले आहे.

उपोषण स्थगित केले असले तरी त्यांनी राज्य सरकारला २ जानेवारीपर्यंतची डेडलाइन दिली आहे. त्यासोबतच येत्या काळात या ठिकाणी साखळी उपोषण सुरूच राहणार असल्याचे सांगत २ जानेवारीपर्यंत घराचा उंबरा शिवणार नसल्याचे स्पष्ट केले. आरक्षण देण्यास जर दिरंगाई झाली तर २ जानेवारीनंतर मुंबईत मराठ्यांचे वादळ धडकेल, असा इशाराही या वेळी मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

Manoj Jarange Patil
Maratha Reservation: मोठी बातमी ! मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित; सरकारला दिली नवी डेडलाइन

आरक्षण समितीने राज्यभर फिरून अहवाल द्यावा, 'वेळ घ्या, पण सरसकट आरक्षण द्या', ,'आता वाढवून दिलेली मुदत अखेरची','कोणत्या टप्प्यावर थांबायचं हे ठरवावं लागेल', 'सर्वांची दिवाळी गोड व्हायला हवी', यासाठी राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे यांना आरक्षण देण्यासाठी दोन महिन्यांचा वेळ मागितला.

मात्र, मनोज जरांगे पाटील हे २४ डिसेंबरपर्यंत वेळ देण्यास ठाम होते. यानंतर सरकारी शिष्टमंडळाने विनंती केल्यानंतर त्यांनी आरक्षण देण्यासाठी २ जानेवारीपर्यंत सरकारला वेळ दिला आहे. या वेळी बोलताना जरांगे म्हणाले आहेत की, 'वेळ घ्या, मात्र आरक्षण द्या,' असे आवाहन त्यांनी राज्य सरकारला केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Manoj Jarange Patil
Maratha Resevertion : नगरच्या तरुणांनी दिली मराठा आंदोलनाला सकारात्मक ‘ऊर्जा’

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आपल्याला लढाई जिंकायची आहे, ती जिकणार. मी मराठ्यांचा अपमान होऊ देणार नाही. सरकारला वेळ द्यायची का, असं त्यांनी या वेळी आंदोलकांना विचारलं. यानंतर उपस्थित सर्व आंदोलकांनी एका सुरामध्ये होकार दर्शविला.

त्यानंतर आपण आंदोलन स्थगित करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी उपोषण स्थगित केले असले तरी त्यांनी राज्य सरकारला २ जानेवारीपर्यंतची डेडलाइन दिली आहे. त्यासोबतच येत्या काळात या ठिकाणी साखळी उपोषण सुरूच राहणार असल्याचे सांगत २ जानेवारीपर्यंत घराचा उंबरा शिवणार नसल्याचे स्पष्ट केले.

येत्या काळात मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळणार असेल तर वेळ देऊ. दोन दिवसांत सर्व गुन्हे मागे घ्या, सरकारला वेळ देण्याची माझी तयारी आहे. सरसकट प्रमाणपत्रासाठी काम करावे. आम्ही आरक्षण मिळावे, या साठी अनेक वर्षे थांबलो आहोत अजून काही दिवस थांबायची तयारी असल्याचे सांगत त्यांनी उपोषण मागे घेतले.

Edited By- Ganesh Thombare

Manoj Jarange Patil
Maratha Reservation :'....तर सरकारला आणखी वेळ देण्यास तयार'; जरांगे पाटलांची शिष्टमंडळाशी चर्चा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com