

Chandrapur Municipal Corporation news : चंद्रपूर महापालिकेच्या निवडणुकीनंतर सत्तेचा हातातोंडाशी आलेला घास भाजपने हिरावून घेतला होता. पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातील चढाओढीच्या राजकारणामुळे महापालिकेत काँग्रेसला सत्ता गमवावी लागली. दोघांमधील वाद दिल्लीपर्यंत जाऊनही पडदा पडला नव्हता. अखेर भाजपने संधी साधत आपली सत्ता आणली. आता पुन्हा एकदा महापालिकेत धमाका होण्याची चिन्हे आहेत.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी रविवारी धक्कादायक दावा करत राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. वडेट्टीवार यांनी मीडियाशी बोलताना चंद्रपूर महानगरपालिकेवर लवकरच काँग्रेसची सत्ता येणार असल्याचा दावा केला आहे. त्यावेळी आपली चूक झाल्याचे मान्य करत आता त्यांनी पुन्हा एकदा सत्ता काबीज करण्यासाठी आपल्याकडे पुरेसे संख्याबळ असल्याचे संकेत दिले आहेत.
वडेट्टीवार यांनी काँग्रेसकडे ४२ नगरसेवक असल्याचे म्हटले आहे. भाजपकडे केवळ २४ नगरसेवक असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यापैकीही काही नगरसेवक आपल्याकडे येऊ शकतात, असा दावा करत वडेट्टीवार यांनी भाजपचे टेन्शन वाढविले आहे. महापालिकेत काँग्रेसचे मताधिक्य असल्याने लवकरच सत्ताबदल झालेला असा विश्वास वडेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे.
वडेट्टीवार यांच्या दाव्यामुळे चंद्रपूरच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. चंद्रपूर महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या दोन नेत्यांमधील वादामुळे अनेक दिवस सत्तेची स्थिती अधांतरी होती. या वादामुळे महापौर निवडणुकीत केवळ एका मताने भाजपच्या उमेदवार विजयी संगीता खांडेकर विजयी झाल्या होत्या.
महापालिकेत बहुमतासाठी ३४ मतांची गरज होती. खांडेकर यांना ३२ तर काँग्रेस उमेदवाराला ३१ मते मिळाली होती. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने भाजपला साथ दिली होती. भाजपकडे २४ नगरसेवक होते. तर काँग्रेसचे २७ नगरसेवक निवडून आले होते. या निकालानंतर काँग्रेसने आपलीच सत्ता येणार असल्याचा दावा करत जल्लोषही केला होता. पण नगरसेवकांची जुळवाजुळव करताना वडेट्टीवार आणि धानोरकर यांच्यातील वादाने सगळं गणित बिघडवलं होतं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.