
New Delhi News : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस खासदार प्रफुल पटेल आणि विरोधकांमध्ये जुगलबंदी रंगली होती. विशेष म्हणजे यावेळी तालिका सभापती म्हणून खासदार सुनेत्रा पवार काम पाहत होत्या. पटेलही पहिल्यांदाच त्यांच्यासमोर भाषण करत होते. यादरम्यान वेळेच्या मुद्द्यावरून जुगलबंदी पाहायला मिळाली.
अर्थसंकल्पावर पटेल यांनी मंगळवारी राज्यसभेत भाषण केले. भाषणाच्या सुरुवातीलाच पटेल तालिका सभापतींना उद्देशून म्हणाले, ‘माझे सौभाग्य आहे की, तुम्ही पीठासीन आहात आणि मला बोलण्याची संधी मिळाली आहे.’ काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी मात्र त्यांच्या भाषणावर आक्षेप घेतला. भाजपनंतर बोलण्याची संधी काँग्रेसला मिळायला हवी, ही पध्दत आहे, असे ते म्हणाले. त्यावर पटेलांनी उत्तर दिले.
मी काल बोलणार होतो. पण आज बोलण्याची संधी देण्याची विनंती केली होती, असे पटेलांनी सांगितल्यानंतर जयराम रमेश शांत झाले. पटेलांनी भाषणादरम्यान अर्थसंकल्पाचे कौतुक करताना मोदी सरकारच्या कामगिरीवरही कौतुकाचा वर्षाव केला. त्यांनी जवळपास 17 मिनिटे भाषण केले.
सुनेत्रा पवारांनी 15 व्या मिनिटाला बेल वाजवत वेळ संपल्याची आठवण करून दिली. त्यानंतरही पटेल बोलतच राहिले. त्यामुळे विरोधकांनी वेळ संपली, मॅडम बेल वाजवा. असे बोलण्यास सुरूवात केली. त्यामुळे सुनेत्रा पवारांनी लगेच माननीय सदस्य तुमची वेळ संपली आहे, असे सांगत पटेलांना भाषण संपण्याबाबत सूचना केली.
विरोधक व्यत्यय आणू लागल्यानंतर पटेलांनी लगेच सत्ताधारी बाकांकडे हात दाखवत मला इकडून वेळ आहे, असा पलटवार केला. त्यावरही विरोधकांनी ‘कुठून’ असे म्हणताच पटेल ‘भाजप’कडून म्हणाले. ‘तुमच्याकडे तर वेळच नाही. त्यांच्याकडे वेळच वेळ आहे. इशारा समजून घ्या,’ असा टोलाही पटेलांनी लगावला. त्यानंतर त्यांनी काही सेकंदात आपले भाषण आटोपते घेतले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.