Acharya Pramod Krishnam News : काँग्रेसमधून निलंबित करताच आचार्य प्रमोद यांनी राम अन् राष्ट्र म्हणत विषय संपवला...

Congress : आचार्य प्रमोद यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका...
Acharya Pramod Krishnam
Acharya Pramod KrishnamSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर काही दिवसांतच आचार्य प्रमोद कृष्णम यांना काँग्रेसने पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे. पक्षविरोधी कारवायांचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. उत्तर प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रस्तावाचा दाखला पक्षाकडून देण्यात आला आहे. आचार्य यांनी 2019 मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर लोकसभेची निवडणूक लढवली होती. (Acharya Pramod Krishnam News)

आचार्य यांनी लखनऊ मतदारसंघातून निवडणूक लढवली होती पण त्यांचा पराभव झाला. मागील काही दिवसांपासून ते राम मंदिराच्या मुद्दायवर काँग्रेसवर (Congress) टीका करत होते. तसेच पंतप्रधान मोदींचे कौतुक करताना दिसत होते. त्यांनी भेटही आचार्य प्रमोद यांनी घेतली होती. याच मुद्द्यावरून उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) काँग्रेसने त्यांच्यावर कारवाई करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता.

Acharya Pramod Krishnam
Loksabha Election 2024 : महायुतीच्या मेळाव्याचा प्रभाव ओसरला? मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर इच्छुकही शांत!

पक्षविरोधी कारवाया आणि सातत्याने पक्षाविरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी सहा वर्षे निलंबित करण्याची कारवाई आचार्य यांच्यावर केल्याचे काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पक्षातून निलंबित करण्यात आल्यानंतर आचार्य यांनी दुसऱ्यादिवशी रविवारी सकाळी पहिली प्रतिक्रिया दिली. त्यांनी पक्षाचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या ट्विटरवर टॅग करून म्हटले आहे की, ‘राम आणि राष्ट्र याबाबतीत समझोता केला जाऊ शकत नाही.’

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आचार्य प्रमोद हे सातत्याने राहुल गांधी यांचा विरोध करताना दिसत होते. तर प्रियांका गांधीच्या बाजूने बोलत होते. प्रियांका यांच्या हाती पक्षाची जबाबदारी दिली तर पक्षाला यश मिळेल, असे ते म्हणत होते. तर मागील काही दिवसांपासून ते भाजपविषयी सहानुभूतीने बोलत होते. राम मंदिरावरून त्यांनी भाजपचे समर्थनही केले होते. प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यावर काँग्रेसने टाकलेल्या बहिष्कारावरून त्यांनी टीका केली होती. ते 22 जानेवारीला अयोध्येत गेले होते.

कोण आहेत आचार्य प्रमोद?

आचार्य प्रमोद यांचा जन्म 4 जानेवारी 1965 रोजी उत्तर प्रदेशातील संभळ मध्ये त्यागी परिवारात झाला होता. त्यांनी दोनवेळा काँग्रेसच्या तिकीटावर लोकसभेची निवडणूक लढवली. 2014 मध्ये संभळमधून तर 2019 मध्ये लखनऊमधून त्यांना उमेदवारी देण्यात आली होती. दोन्हीही वेळा त्यांचा पराभव झाला. काँग्रेसच्या उत्तर प्रदेश सल्लागार समितीत त्यांचा सहभाग होता. प्रियांका गांधी यांनी ही समिती स्थापन केली होती. आगामी लोकसभेतीसाठी संभळ आणि लखनऊ हे दोन्ही मतदारसंघ समाजवादी पक्षाकडे गेल्यानेही ते नाराज होते, अशीही चर्चा आहे.

Acharya Pramod Krishnam
Lok Sabha Election 2024 : महायुतीचे वरिष्ठ नेते आज गोंदियात, उमेदवारीवर होईल का शिक्कामोर्तब ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com