

Rajya Sabha Election Controversy News : देशाती राज्यसभा निवडणुकांच्या अर्ज प्रक्रियेत दोन वेगवेगळ्या राज्यांतून अत्यंत धक्कादायक चित्र समोर आले आहे. मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मीनाक्षी नटराजन यांच्यावर थेट अर्ज बाद करत कारवाईची कुऱ्हाड चालवण्यात आली आहे, तर दुसरीकडे झारखंडमध्ये भाजप आणि एनडीए पुरस्कृत अपक्ष उमेदवार, उद्योगपती परिमल नथवाणी यांच्या अर्जातील त्रुटींवर मात्र मवाळ भूमिका घेतली गेल्याचा आरोप होत आहे. एकाच देशात, एकाच निवडणूक प्रक्रियेत विरोधी पक्षाला एक आणि सत्ताधाऱ्यांच्या पाठबळ असलेल्या उमेदवाराला दुसरा न्याय लावला जात आहे का? असा संतप्त सवाल विचारला जात आहे.
मध्य प्रदेशात काँग्रेसला मोठा झटका; नटराजन यांचा अर्ज बाद!
मध्य प्रदेशातील राज्यसभानिवडणुकीत काँग्रेसने आपल्या ज्येष्ठ नेत्या मीनाक्षी नटराजन यांना मैदानात उतरवले होते. मात्र, भाजपचे उमेदवाराच्या वकिलांनी घेतलेल्या हरकतीनंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मीनाक्षी नटराजन यांचा अर्ज थेट 'बाद' ठरवला.
काय आहे कारण?
तेलंगणामधील (हैदराबाद कोर्ट) एका प्रलंबित खटल्याची (Criminal Case) माहिती मीनाक्षी नटराजन यांनी आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात (Affidavit) लपवून ठेवली, असा आक्षेप भाजपने घेतला होता. हा आक्षेप वैध ठरवत निवडणूक अधिकाऱ्यांनी नटराजन यांचा अर्ज बाद केला. परिणामी, मध्य प्रदेशातील काँग्रेसची जागा धोक्यात आली असून भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. काँग्रेसने या कारवाईला 'राजकीय सूडबुद्धी' म्हटले आहे.
झारखंडमध्ये भाजप पुरस्कृत परिमल नथवाणींना 'दिलासा'?
एकीकडे मध्य प्रदेशात काँग्रेस उमेदवाराचा अर्ज थेट बाद केला जात असताना, झारखंडमधील चित्र पूर्णपणे वेगळे आहे. झारखंडमध्ये भाजपने संख्याबळ नसल्याचे कारण पुढे करत स्वतःचा उमेदवार न उतरवता उद्योगपती परिमल नथवाणी यांना अपक्ष म्हणून पाठिंबा दिला आहे.
भाजपचे सर्व प्रमुख आमदार नथवाणी यांचे प्रस्तावक बनले आहेत. नथवाणी यांच्या अर्जातील त्रुटींनंतरही अर्ज बाद न करता होल्डवर ठेवण्यात आला असून अर्जात सुधारणा करण्यासाठी अतिरिक्त वेळ आणि सवलत दिली जात आरोप होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.