Rajya Sabha debate : राज्यसभेत 'मेंटल बॅलन्स'वरून खर्गे संतापले; आता सोडणार नाही म्हणताच नड्डांवर माफी मागण्याची वेळ

Mallikarjun Kharge Reacts Sharply to Mental Balance Comment : तुम्ही पक्षाशी एवढे जोडले आहात की देशाचा विषय गौण ठरतो आणि त्यामुळे मेंटल बॅलन्स जाऊन तुम्ही त्या शब्दांचा प्रयोग करता, असे जे. पी. नड्डा हे मल्लिकार्जून खर्गे यांना उद्देशून म्हणाले.
Mallikarjun Kharge, JP Nadda
Mallikarjun Kharge, JP NaddaSarkarnama
Published on
Updated on

JP Nadda Faces Backlash and Issues Apology : राज्यसभेत मंगळवारी ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खर्गे आणि केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली. खर्गे यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला चढवला होता. मोदी शिव्यांचा हिशोब ठेवतात, पण डोनाल्ड ट्रम्प यांच्याविषयी ते गप्प राहतात, असा निशाणा खर्गेंनी साधला. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी उठलेल्या नड्डा यांनी खर्गेंविषयी वापरलेल्या शब्दांमुळे मोठा गदारोळ झाला.

खर्गे यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना नड्डा यांनी त्यांची काही विधाने कामकाजातून वगळण्याची विनंती उपसभापतींकडे केली. तसेच पंतप्रधान मोदी हे जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते आहेत. त्यांच्या नेतृत्व क्षमतेवर आपल्याला गर्व आहे. केवळ पक्षालाच नाही तर देशालाही याचा अभिमान असल्याचे सांगताना नड्डा यांनी खर्गेंवरही निशाणा साधला.

तुम्ही पक्षाशी एवढे जोडले आहात की देशाचा विषय गौण ठरतो आणि त्यामुळे मेंटल बॅलन्स जाऊन तुम्ही त्या शब्दांचा प्रयोग करता, असे नड्डा म्हणाले. त्यावर काँग्रेसच्या खासदारांनी जोरदार आक्षेप घेतला. ही बाब लक्षात घेताच नड्डांनी शब्द मागे घेत असल्याचे सांगत मानसिक संतुलन नव्हे भावनाविवश हा शब्द कामकाजात घालण्याची विनंती केली. मात्र, त्यानंतरही विरोधकांचे समाधान झाले नाही.

Mallikarjun Kharge, JP Nadda
Shrikant Shinde : मॅच्युअर व्हा, महापालिकेत नाय आता..! लोकसभेतच '50 खोके एकदम ओके' म्हणणाऱ्या महिला खासदारावर श्रीकांत शिंदे भडकले...

नड्डा यांनी शब्द मागे घेतल्यानंतरही खर्गे बोलण्यास उभे राहिले. मी काही मंत्र्यांचा सन्मान करतो, जे त्यांचा बॅलन्स ढळू न देता बोलतात. त्यामध्ये राजनाथ सिंह नड्डांही आहेत. ते मला म्हणताहेत मेंटल बॅलन्स गेला. ही लाजीरवाणी बाब आहे, त्यांनी माफी मागायला हवी, अशी जोरदार मागणी खर्गे यांनी केली.

Mallikarjun Kharge, JP Nadda
Amit Shah vs Rahul Gandhi : अमित शहांकडून संसदेतच राहुल गांधींना चॅलेंज; लोकसभेत जोरदार घमासान...

नड्डा यांनीही लगेच विरोधी पक्षनेते आदरणीय आहेत, त्यांचा मी आदर करतो असे म्हणत त्यांच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो, असे म्हणाले. पण भावनाविवश होत तुम्ही खूप वाहत गेला, इतके वाहत गेलात की पंतप्रधानांच्या प्रतिष्ठेचे भानही तुम्हाला राहिले नाही, याचे दु:ख असल्याचेही नड्डा म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com