Rajya Sabha Session : जया अमिताभ बच्चन... असे पुकारताच जया बच्चन भडकल्या! राज्यसभेत सुनावले खडेबोल...

Rajya Sabha Session Union Budget 2024 : राज्यसभेत जया बच्चन यांनी उपसभापती हरिवंश यांच्याकडे नाराजी व्यक्त केली.
Jaya Bachchan
Jaya BachchanSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : समाजवादी पक्षाच्या जया बच्चन यांना राज्यसभेत विविध मुद्द्यांवर परखडपणे बोलताना अनेकदा पाहिले असेल. पण सोमवारी त्यांचा संताप अभिताभ बच्चन या नावावरून समोर आला. राज्यसभेत उपसभापतींनी जया अमिताभ बच्चन... असे पुकारा केल्यानंतर त्या भडकल्याचे दिसून आले.

राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी कामकाजादरम्यान जया बच्चन यांना बोलण्याची परवानगी दिली. एका सदस्याने म्हणणे मांडल्यानंतर उपसभापतींनी जया अभिताभ बच्चन असे नाव घेत त्यांना बोलण्यास सांगितले. हे ऐकत उभ्या राहिलेल्या जया बच्चन यांनी त्यावरून प्रचंड नाराजी व्यक्त केली.

Jaya Bachchan
Lok Sabha Session : राहुल गांधींनी ओम बिर्लांना केलं चॅलेंज; किरण रिजिजू भडकले...   

तुम्ही केवळ जया बच्चन म्हटले असते तर पुरेसे होत, असे सांगत त्या म्हणाल्या, ‘महिला आपल्या पतीच्या नावाने ओळखल्या जाणार, हे असेच आहे. त्यांचे काहीच अस्तित्व नाही. त्यांनी काहीच कमावलेले नाही.’ त्यावर हरिवंश यांनी तसे इथे लिहिले असल्याचे सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. पण जया बच्चन यांनी हे नवीनच सुरू झाल्याचे म्हणत त्यावरही नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, राज्यसभेत दिल्लीतील तीन विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या घटनेवर चर्चा झाली. यावेळी बोलताना जया बच्चन यांनी सर्वच राजकीय पक्षांच्या सदस्यांवर नाराजी व्यक्त केली. निर्भया घटनेचा उल्लेख करताना जया बच्चन यांना आपल्या भावना अनावर झाल्या. त्या घटनेला आजही मी विसरू शकत नाही. आज मी एक आई आणि आजी म्हणून उभी आहे. आज प्रत्येकाने मुलांना श्रध्दांजली वाहिली. पण त्यांच्या कुटुंबियांवर कुणीही बोलले नाही, असे म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली.

Jaya Bachchan
Lok Sabha Session : राहुल गांधींनी 6 जणांची नावं घेत भाजपला चक्रव्युहात अडकवलं!

कुणीही अशा घटनांवर राजकारण करू नये. प्रत्येकजण राजकारण करत आहे. ही राज्यसभा आहे. आपण एकाच उद्देशाने इथे बोलायला हवे. मी शपथ घेण्यासाठी इथे आले त्यादिवशी माझ्या घरात गुडघाभर पाणी होते. ही कोणत्याही सरकारची चूक नाही, तर आपल्या सर्वांचीच चूक आहे. आपण त्याच्या तक्रारी करत नाही. आपण केवळ राजकीय गप्पा मारत आहोत, असे म्हणत जया बच्चन यांनी सर्व सदस्यांना खडेबोल सुनावले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com