VHP letter Ayodhya Police : अयोध्या राम मंदिर दानचोरी प्रकरण; प्रियांका गांधी, अरविंद केजरीवाल यांच्या विधानांची चौकशी करा, 'विहिंप'च्या पत्राने वाढवली अडचण

VHP urges Ayodhya Police to probe opposition leaders claims over Ram Temple donations : अयोध्येतील श्रीराम मंदिरातील दानासंदर्भातील कथित गैरव्यवहाराच्या आरोपांवरून विश्व हिंदू परिषदने उत्तर पोलिसांनी पत्र देत, विरोधकांच्या विधानांच्या चौकशीची मागणी केली आहे.
VHP letter Ayodhya Police
VHP letter Ayodhya PoliceSarkarnama
Published on
Updated on

Ram Mandir donation controversy : अयोध्येतील श्रीराम मंदिराला मिळालेल्या दानासंदर्भातील कथित गैरव्यवहाराच्या आरोपांवरून विश्व हिंदू परिषद (विहिंप) आणि विरोधी पक्षांमध्ये वाद निर्माण झाला आहे.

विरोधी पक्षांच्या काही नेत्यांनी केलेल्या दाव्यांची चौकशी करून आवश्यक असल्यास त्यांच्याकडून पुरावे मागवावेत, अशी मागणी विहिंपने अयोध्या पोलिसांकडे केली आहे.

विहिंपचे (VHP) आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आलोक कुमार यांनी पोलिस उपअधीक्षक आशुतोष तिवारी यांना पत्र पाठवून काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी, आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल, समाजवादी पक्षाचे नेते रामगोपाल यादव आणि आपचे खासदार संजय सिंह यांच्या सार्वजनिक विधानांचा उल्लेख केला आहे.

आलोक कुमार यांनी पत्रात म्हटले आहे की, गेल्या काही काळात काही विरोधी नेत्यांनी श्रीराम मंदिरातील (Ram Mandir) दानासंदर्भात विविध आरोप सार्वजनिकरित्या केले आहेत. हे आरोप सोशल मीडिया, वृत्तवाहिन्या आणि इतर माध्यमांतून करण्यात आले असून, त्यांची सत्यता तपासणे आवश्यक आहे. जर या विधानांमुळे समाजात तणाव किंवा तिरस्काराची भावना निर्माण होत असल्याचे आढळले, तर संबंधितांवर कायदेशीर कारवाईचा विचार करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

VHP letter Ayodhya Police
Subhodh Saoji Letter : राम मंदिर कथित देणगी गैरव्यवहार; ट्रस्टचा कारभार लष्कराकडे द्या, सुबोध सावजींचे राष्ट्रपतींना पाठवलेल्या पत्रानं खळबळ

विहिंपच्या पत्रानुसार, काही नेत्यांनी मंदिरातील दानचोरीचा आकडा 20 हजार कोटी रुपयांहून अधिक असल्याचा दावा केला आहे. तसेच, प्रियांका गांधी यांनी कथितपणे सीसीटीव्ही कॅमेरे बंद करण्यात आल्याबाबत प्रश्न उपस्थित केल्याचा उल्लेख पत्रात करण्यात आला आहे. या संदर्भातील त्यांच्या विधानांबाबत स्पष्टीकरण आणि पुरावे मागवावेत, असे विहिंपचे म्हणणे आहे.

VHP letter Ayodhya Police
Ram Mandir Crores Scam : राम मंदिरात महाकुंभातच कोट्यवधींचा ‘खेळ’? देणगी अपहारात मेहुण्यांची जोडी, ‘राम राज्य कोष’ पेटीतून सापडली मोठी रोकड!

मौल्यवान दागिने चोरीला

त्याचप्रमाणे, अरविंद केजरीवाल यांनी मंदिरातून 200 कोटी रुपयांची रोख रक्कम, भगवान श्रीरामाची माळ, चरण पादुका, हिरे, दागदागिने, दीप आणि चांदीच्या विटांसह विविध मौल्यवान वस्तू चोरीला गेल्याचा आरोप केल्याचा उल्लेखही पत्रात करण्यात आला आहे.

पोलिस, ईडीकडून चौकशी का नाही?

विहिंपने पत्रात असा प्रश्नही उपस्थित केला आहे की, जर इतक्या मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचे किंवा चोरीचे आरोप करण्यात आले असतील, तर उत्तर प्रदेश पोलिस, सक्तवसुली संचालनालय (ईडी) आणि केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) यांच्याकडे त्याबाबत कोणती कारवाई किंवा चौकशी झाली आहे का, याचीही स्पष्टता यायला हवी.

विधानांची कायदेशीर चौकशी करा

दानचोरीच्या कथित प्रकरणाबाबत समाजवादी पक्षाचे रामगोपाल यादव आणि आम आदमी पक्षाचे संजय सिंह यांनी केलेल्या विधानांचाही उल्लेख विहिंपने आपल्या पत्रात केला आहे. या सर्व दाव्यांची वस्तुनिष्ठ चौकशी करून आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया राबवावी, अशी मागणी विहिंपने अयोध्या पोलिसांकडे केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com