

Karnataka Congress Politics : कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर डी. के. शिवकुमार यांना दोन दिवसांतच मोठा हादरा बसला आहे. त्यांच्यासोबत १३ मंत्र्यांचाही शपथविधी पार पडला होता. त्यानंतर गुरूवारी सायंकाळीच खातेवाटपही झाले. मात्र, काही तासांतच एका कॅबिनेट मंत्र्यांनी पदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्याने राज्यात खळबळ उडाली आहे.
कॅबिनेट मंत्री रामालिंगा रेड्डी यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेत आपली नाराजी मांडली, तसेच राजीनाम्याचे पत्रही मीडियासमोर दाखविले. त्यांना खातेवाटपामध्ये सिंचन खाते देण्यात आले होते. मात्र, या खात्यामुळे ते नाराज झाले होते. मंत्रिपदाची शपथ घेण्याआधी अन्य खात्याचे आश्वासन देण्यात आले होते, असे रेड्डी यांनी सांगितले.
रेड्डी यांच्या राजीनाम्यावर शिवकुमार यांचीही प्रतिक्रिया आली आहे. रेड्डी हे आपले जवळचे मित्र आहेत. चिंतेचे कोणतेही कारण आहे. आम्ही अडचणी दूर करू, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, राजीनाम्यावर बोलताना रेड्डी यांनी आपण केवळ मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे, काँग्रेस पक्ष सोडलेला नाही, असे स्पष्ट केले.
मीडियाशी बोलताना रेड्डी यांनी सांगितले की, मला अन्य मंत्रालय देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मला बेंगलुरू विकास मंत्रालय दिले जाईल, असे फोन करून सांगण्यात आले होते. पण जेव्हा खातेवाटप झाले तेव्हा मला परिवहन मंत्रालय देण्यात आले. यावर पुन्हा चर्चा झाली.
शिवकुमार हे मुख्यमंत्री बनण्याआधी माझ्या घरी आले होते. त्यांनीही मला बेंगलुरू मंत्रालय दिले जाईल, असे सांगितले होते. त्यांनी स्वत:चे हे मंत्रालय देण्याबाबत स्पष्ट केले होते. पण सिंचन खाते दिले. त्यामुळे मी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचे रेड्डी यांनी स्पष्ट केले. सिध्दरामय्या, शिवकुमार किंवा खर्गे यांच्याविषयी माझी काहीही तक्रार नाही. आता आपल्याला बेंगलुरू मंत्रालय मिळाले, तरी ते स्वीकारणार नाही, असे सांगत रेड्डी यांनी शिवकुमारांचे टेन्शन वाढविले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.