Ramdas Athawale : 'उद्धव ठाकरेंना त्यांचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी घोषित करावं, अशी तीव्र इच्छा होती, मात्र..'

Ramdas Athawale On Mahayuti CM Post Candidate : केंद्रीयमंत्री रामदास आठवलेंचं वक्तव्य; महायुतीचा मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचं असेल हे देखील सांगितलं आहे.
Ramdas Athawale
Ramdas Athawalesarkarnama
Published on
Updated on

Ramdas Athawale Pune News : आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असणार? यावरून सध्या जोरदार राजकीय चर्चा रंगताना पाहायला मिळत आहेत. एकीकडे महाविकास आघाडीतील ठाकरे गटाने निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा, अशी मागणी केली असतानाच त्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आणि काँग्रेसने विरोध केला आहे.

तर दुसरीकडे अजित पवार यांनी बिहार पॅटर्ननुसार निवडणुका नंतर आपल्याला मुख्यमंत्री करावं अशी मागणी थेट गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली असल्याच्या बातम्या सध्या येत आहेत.

या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले पुणे दौऱ्यात पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री पदाबाबत सुरू असलेल्या महाविकास आघाडी आणि महायुती मधील घडामोडींवर टिप्पणी केली आहे.

माध्यमांशी बोलताना रामदास आठवले(Ramdas Athawale) म्हणाले, 'आगामी विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमधून उभा राहिले पाहिजे. लोकसभेला जरी आपली सीट पडली असली तरी विधानसभेत त्यांना बारामतीचा किल्ला जिंकायला अवघड जाणार नाही. ते विकासपुरुष आहेत एक खूप अ‍ॅक्टिव्ह असतात आम्ही सर्व त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहू आणि त्यांना बारामतीतून निवडून आणू.'

Ramdas Athawale
Mahavikas Aghadi on Bawankule: संकेत बावनकुळेच्या कार अपघात प्रकरणावर 'मविआ'तील तिन्ही पक्षांची वेगळी भूमिका!

आगामी विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल? याबाबत विचारलं असता आठवले म्हणाले, 'सध्या राज्यात भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे. त्यांच्याकडे 105 आमदार आहेत. अजित पवारांकडे 42 आमदार आहेत तर शिंदेंकडे अपक्ष धरून 50 आमदारांचा पाठिंबा आहे.

सर्वात मोठा भाजप(BJP) हा पक्ष असताना देखील देवेंद्र फडणवीस यांनी मोठं मन करून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केला आहे आणि त्यांनी देखील गेल्या अडीच वर्षात उत्तम कामगिरी केली आहे. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत ज्यांचे जास्त आमदार येतील त्यांचा मुख्यमंत्री आणि ज्यांचे कमी आमदार येतील त्यांचा उपमुख्यमंत्री या पद्धतीने मार्ग निघू शकेल.' असं रामदास आठवले म्हणाले.

Ramdas Athawale
Jharkhand Politics : हेमंत सोरेन सरकार पुन्हा संकटात? ; ''झामुमो अन् काँग्रेसचे 15-16 आमदार भाजपच्या संपर्कात ''

याशिवाय आठवले पुढे म्हणाले, 'महाविकास आघाडीमध्ये देखील अद्याप मुख्यमंत्री पदाचा चेहरा निश्चित झालेला नाही. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांना त्यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी घोषित करावे, अशी तीव्र इच्छा होती. मात्र त्याला काँग्रेसने मोठा विरोध केला आहे. आता झालेला लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला मोठा यश मिळाले आहे. त्यांनी 13 जागा जिंकल्या आहेत तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने देखील कमी जागा लढवून चांगल्या जागा जिंकल्या आहेत.'

तसेच 'या दोन्ही पक्षांचा स्ट्राईक रेट चांगला आहे. त्या प्रमाणात उद्धव ठाकरे यांनी जास्त जागा लढवून त्यांना कमी जागा जिंकता आलेल्या आहेत. त्यामुळे दोन्हीकडची परिस्थिती पाहता सध्यातरी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा महाविकास आघाडी आणि महायुती जाहीर करेल असं वाटत नाही. निवडणुकीनंतर ज्यांच्या जास्त जागा निवडून येतील त्यांचा मुख्यमंत्री होईल.' असं रामदास आठवले म्हणाले

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com