Ramdas Athawale On Reservation : मराठा आरक्षणावर रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य; "जरांगेंची मागणी..."

Manoj Jarange Maratha Protest : जातीनिहाय जनगणना करण्याचे केंद्राला आठवलेंचा आवाहन
Ramdas Athawale, Manoj Jarange
Ramdas Athawale, Manoj JarangeSarkarnama
Published on
Updated on

Delhi Political News : मराठा आरक्षणास राज्य सरकार सकारात्मक असून जालन्यात सुरू असलेल्या मराठा आंदोलकांना माझा पाठिंबा आहे. आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी सुरू केले आंदोलन रास्त आहे, असे म्हणत खासदार रामदास आठवलेंनी मराठा आरक्षणाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. मराठ्यांना आरक्षणासाठी आठवलेंनी काही पर्याय देऊन त्यावर सराकराने विचार करण्याचे आवाहन आठवलेंनी केले. तसेच विरोधकांना केलेल्या टीकेलाही त्यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. (Latest Marathi Political News)

मराठा आरक्षणाबाबत रामदास आठवले म्हणाले, 'आंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे उपोषणाला बसले आहेत. त्यांची मागणी रास्त आहे. मराठा समाजात मागासलेली कुटुंब आहेत त्यांना आरक्षण द्यावे. राज्य सरकार आरक्षणाच्या मुद्यावर सकारात्मक आहे. मी रात्री जरांडे पाटील यांना भेटुन पाठिंबा जाहीर करणार आहे', असेही आठवले यांनी सांगितले. (Maharashtra Political News)

Ramdas Athawale, Manoj Jarange
Cabinet On Maratha Reservation : मराठा आंदोलक अन् शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय

आरक्षणाबाबत पर्याय देताना आठवलेंनी सांगितले, 'ओबीसी कोट्यातून आरक्षण द्या अस त्यांचे मत आहे. ओबीसी आरक्षणात वाढ करून मराठा समाजासाठी काही करता येते का हे पाहावे. किंवा वेगळा विचार होतो का हेही पाहावे. जातीनिहाय जनगणना केली तर सगळ्या जातींचा टक्का समजेल आणि त्यांना त्यांचा वाटाही मिळेल, अशी माझ्या पक्षाची मागणी आहे. यावरही केंद्र सरकारने याचा विचार करावा.'

Ramdas Athawale, Manoj Jarange
New Parliament News : पंतप्रधान मोदींचं स्वप्नं साकार! नवीन संसद भवनाच्या कामकाजाचा मुहूर्त अखेर ठरला; 'या' दिवशी दारं उघडणार

मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमारामुळे राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली. यावर बोलताना आठवले म्हणाले, 'मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीसांनी आरक्षणाची बाजू योग्य पद्धतीने मांडली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे, शरद पवार यांनी केलेली टीका ही राजकीय आहे.'

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com