Nagpur News : मुख्यमंत्री शिंदेंनी वाचवले दुचाकीस्वाराचे प्राण; आपला ताफा थांबवत...

CM Eknath Shinde Helped Accident Victims : जखमी रुग्णाला स्वतः रुग्णालयात पोहोचविले...
Eknath Shinde Helping Nagpur Accident Victims
Eknath Shinde Helping Nagpur Accident VictimsSarkarnama

Gondkhairi Accident : नागपुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देवदूताप्रमाणे धावून आल्याने एका व्यक्तीचे प्राण वाचले आहेत. या व्यक्तीसह अन्य तिघांना मदत करून मुख्यमंत्र्यांनी स्वतः त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर योग्य उपचार सुरू होईपर्यंत मुख्यमंत्री रुग्णालयात ठाण मांडून होते.

मुंबईहून नागपूरला पोहोचल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ बाजार गावातील सोलर कंपनीला भेट देत पाहणी केली. या घटनेचा आढावा घेऊन पुन्हा नागपूरकडे परत येत असताना गोंडखैरीच्या बस स्थानकाजवळ अपघात झाल्याचे त्यांना लक्षात आले.

या ठिकाणी झालेल्या अपघातात ट्रक आणि दुचाकीची धडक झाली होती. दुचाकी चालक ट्रकच्या बोनेटमध्ये जाऊन अडकला होता. त्याचवेळी ट्रकला एक वेगन-आर कारही येऊन धडकली. या तिहेरी अपघातात दुचाकी स्वारासह कारमधील काही जण जखमी झालेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Eknath Shinde Helping Nagpur Accident Victims
Maratha Reservation : ''आज्याच्या, बापाच्या जात प्रमाणपत्रावर मराठा असताना...'' ; नाना पटोलेंचा जरांगेंना सवाल!

अपघात झाल्याचे कळताच त्या ठिकाणी नागरिकांची गर्दी झाली होती. गंभीर परिस्थिती पाहता मुख्यमंत्र्यांनी आपला ताफा तिथे थांबवण्याची सूचना केली. त्यानंतर ते स्वतः खाली उतरले. त्या ठिकाणी उभे राहून त्यांनी त्या तरुणाला प्रयत्नपूर्वक ट्रकखालून बाहेर काढायला लावले. अपघातात दुचाकीस्वराच्या पायाला गंभीर दुखापत झाली होते.

अशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ त्याला आपल्या ताफ्यातील रुग्णवाहिका देऊन रुग्णालयाकडे रवाना केली. रुग्णवाहिकेच्या पाठोपाठ शिंदे स्वतः जखमी दुचाकीस्वाराला घेऊन नागपुरातील रवी नगर चौकातील सेनगुप्ता रुग्णालयात घेऊन आले.

रुग्णालयात पोहोचताच मुख्यमंत्री शिंदे यांनी जखमी तरुणाला तत्काळ अतिदक्षता विभागात दाखल करून त्याच्यावर तातडीने उपचार सुरू करण्याची सूचना डॉक्टरांना केली. जखमी तरुणाची प्रकृती आता स्थिर होईपर्यंत मुख्यमंत्री शिंदे हे रवी नगरातील सेनगुप्ता हॉस्पिटलमध्ये तळ ठोकून होते. जखमी झालेल्या तरुणाचे नाव गिरीश केशव तिडके असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

गिरीश नागपूरच्या गोंडखैरीवाडी येथील रहिवासी आहे. या अपघातात जखमी झालेले वंदना राकेश मेश्राम (रा.सिद्धार्थ नगरवाडी,नागपूर), रंजना शिशुपाल रामटेके (रा.रामबाग मेडिकल चौक,नागपूर) आणि शुद्धधन बाळूजी काळपांडे (रा.मौदा,नागपूर) यांनाही रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर डॉक्टरांकडून उपचार सुरू झाले आहेत. जखमी तरुणाला बाहेर काढण्यापासून त्याला रुग्णालयात दाखल करेपर्यंत मुख्यमंत्री शिंदे हे स्वतः मदत करीत होते.

मुख्यमंत्र्यांनी स्वतः पालक बनून या जखमी रुग्णांना तत्काळ मदत केल्यामुळे सर्व जखमींना योग्य वेळेवर उपचार मिळाले. त्यामुळे सर्वांचे प्राण वाचले. मुख्यमंत्र्यांनी समयसूचकता दाखवत केलेल्या या मदतीबद्दल रुग्णांच्या कुटुंबीयांनी त्यांचे आभार मानले. अपघाताच्या घटनास्थळी स्वतः मुख्यमंत्री आल्याचे पाहून गोंडखैरी भागातील अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता.

(Edited by- Ganesh Thombare)

Eknath Shinde Helping Nagpur Accident Victims
Sudhakar Badgujar : सुधाकर बडगुजर यांच्या अडचणीत वाढ; नाशिकमध्ये 'या' प्रकरणात गुन्हा दाखल!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com