Ravi Raja : मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का; बड्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

Sion Koliwada Assembly Constituency: सायन कोळीवाडा मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्याने रवी राजा नाराज होते.
Ravi Raja joins BJP
Ravi Raja joins BJPSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत काँग्रेसला धक्का बसला आहे. महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. सायन कोळीवाडा मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्याने ते नाराज होते. अखेर त्यांनी गुरूवारी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांना पत्र पाठवून राजीनामा दिला.

रवी राजा यांनी गुरूवारी सकाळी राजीनामा दिल्यानंतर काही वेळातच भाजपमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह भाजपचे इतर नेते यावेळी उपस्थित होते. रवी राजा यांनी सोडचिठ्ठी दिल्याने मुंबईत काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

Ravi Raja joins BJP
Maharashtra Assembly Election : राज्यातील 38 मतदारसंघात ‘लाडकी बहीण’ ठरवणार आमदार; कुठे आहे ‘लेडीज फर्स्ट’?

खर्गे यांना पाठवलेल्या पत्रात रवी राजा यांनी म्हटले आहे की, युवक काँग्रेसमध्ये 1980 मध्ये सहभागी होत आपण पक्षाची सेवा केली. आज माझ्या 44 वर्षांच्या सेवेचा पक्षात सन्मान होताना दिसत नाही. त्यामुळे मी पक्षाचा राजीनामा देत असल्याचे रवी राजा यांनी म्हटले आहे.

Ravi Raja joins BJP
Solapur Politics : ऐन निवडणुकीच्या तोंडावर अजितदादांना मोठा धक्का! उपनगराध्यक्षासह 15 नगरसेवकांची पक्षाला सोडचिठ्ठी

सायन कोळीवाडा मतदारसंघातून गणेश यादव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे रवी राजा यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. मुंबई महापालिकेतील काँग्रेसचा चेहरा म्हणून रवी राजांची ओळख होती. त्यांनी महापालिकेत शिवसेनेची सत्ता असताना अनेक आंदोलनांमध्ये सक्रीय सहभाग घेत काँग्रेसची ताकद दाखवून दिली होती. ते चारवेळा नगरसेवक म्हणून निवडून आले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com