USA Tariff : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के टॅरिफ लावल्यानं भारताची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. याचा थेट परिणाम भारतातील व्यापारावर आणि त्यातून निर्माण होणाऱ्या रोजगारावर होणार आहे. भारतासह इतर देशांवरही ही टॅरिफवाढीची कुऱ्हाड कोसळली होती. पण भारतावर ज्या मुजोर पद्धतीनं ट्रम्प यांनी टॅरिफ लावला त्याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते. अखेर याच्या मागचं खरं कारण आता समोर आलं आहे.
१७ जून २०२५ रोजी एका फोन कॉलनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताविरोधातील वागणं हे दिवसेंदिवस कठोर होत गेलं. अमेरिकन वर्तमानपत्र न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार, ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानमध्ये ७ ते १० मे दरम्यान सुरु झालेलं युद्धजन्य संघर्ष थांबवण्याचा वारंवार दावा केला होता.
या दोन्ही देशांमध्ये मध्यस्थी करण्याबाबतही त्यांनी वारंवार भाष्य केलं आहे. पण १७ जून रोजी जेव्हा भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील संघर्ष पूर्णपणे थांबला त्यावेळी ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केला होता. यामध्ये त्यांनी दावा केला होता की, दोन्ही देशांमधील संघर्ष संपवल्याप्रकरणी मी गौरवास प्राप्त आहे. यासाठी पाकिस्तान मला नोबेल पुरस्कार दिला जावा यासाठी नामांकित करणार आहे. या विधानातून ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींना थेट इशारा दिला होता की, त्यांनी देखील आपल्याला नोबेल मिळावा यासाठी शिफारस करावी.
न्यूयॉर्क टाइम्सनं या फोनची माहिती असणाऱ्या काही सुत्रांच्या हवाल्यानं आपल्या वृत्तात दावा केला आहे की, पंतप्रधान मोदी हे यासाठी सहमत नव्हते. उलट त्यांनी स्पष्टपणे हे सांगितलं की, भारत आणि पाकिस्तानमधील ताज्या संघर्षाला विराम देण्यात अमेरिकेची कोणतीही भूमिका नाही. भारत आणि पाकिस्तानमध्ये परस्पर चर्चेनंतर हा निर्णय झाला आहे. पण ट्रम्प यांनी मोदींच्या या टिप्पणीकडं दुर्लक्ष केलं. पण मोदींनी ट्रम्प यांना नोबेल मिळावा याबाबत काहीच भूमिका न घेतल्यानं या दोन्ही राष्ट्र प्रमुखांच्या द्विपक्षीय नात्यात काहीसा मिठाचा खडा पडला.
दरम्यान, न्यूयॉर्क टाईम्सच्या अहवालात हा देखील दावा करण्यात आला आहे की, या फोन कॉलबाबत भारतातील डझनभर अधिकाऱ्यांशी या वर्तमानपत्रानं चर्चा केल्यानंतर याबाबत बातमी छापली आहे. यापैकी अनेक अधिकाऱ्यांनी आपल्या नावांचा खुलासा न करण्याच्या अटीवर या गोष्टी न्यूयॉर्क टाइम्सला सांगितल्या आहेत. कारण डोनाल्ड ट्रम्प हे आपल्या सर्वात महत्वाच्या मित्र राष्ट्रासोबत संबंध खराब करण्याच्या प्रयत्नात आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.