Shivdeep Lande : राजीनामा दिलेले IPS शिवदीप लांडे राजकारणात? प्रशांत किशोर यांच्या पक्षातून...

Shivdeep Lande Prashant Kishor Politics : आपल्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून राजीनामा दिलेले IPS अधिकारी शिवदीप लांडे यांनी ते राजकारणात जाणार की नाही यावर स्पष्टीकरण दिले आहे.
Shivdeep Lande Prashant Kishor
Shivdeep Lande Prashant Kishorsarkarnama
Published on
Updated on

Shivdeep Lande News : बिहारमधील मराठमोळे डॅशिंग IPS अधिकारी शिवदीप लांडे यांनी राजीनामा दिला आहे. बिहारमध्ये शिवदीप लांडे हे 'सिंघम' पोलिस अधिकारी म्हणून परिचित होते. मात्र, त्यांनी राजीनामा दिल्याने उलट सुलट चर्चा सुरू आहेत.

शिवदीप लांडे हे राजकारणात प्रवेश करणार असून ते प्रशांत किशोर यांच्या जनसुराज्य पक्षात जाणार असल्याच्या जोरदार चर्चा आहेत. मात्र, या स्वतः शिवदीप यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

आपल्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून शिवदीप लांडे यांनी ते राजकारणात जाणार की नाही यावर स्पष्टीकरण दिले आहे. शिवदीप म्हणाले आहेत. माझ्या राजीनाम्यानंतर, काही प्रसारमाध्यमांनी कदाचित मी कोणत्यातरी राजकीय पक्षात प्रवेश करणार आहे,अशी शक्यता वर्तवली आहे.

मी सर्वांना सांगू इच्छितो की, मी कोणत्याही राजकीय पक्षाशी बोलत नाही आणि कोणत्याही पक्षाच्या विचारधारेमध्ये जाणार नाही.माझे नाव कोणाशीही जोडू नका.

Shivdeep Lande Prashant Kishor
NCP Vs Nitesh Rane : राणेंविरोधात NCP ची नाराजी वाढली; दिल्लीतील तक्रारीनंतर आता फडणवीसांना पत्र; कठोर कारवाई होणार?

शिवदीप लांडे यांनी हे स्पष्ट केले आहे की ते कोणत्याही राजकीय पक्षात जाणार नाही. मात्र ते बिहारमध्येच राहून काम करणार आहेत.

राजीनामा देताना काय म्हणाले?

आपल्या राजीनाम्याविषयी माहिती देताना फेसबुक पोस्टकरत शिवदीप लांडे म्हणाले की, गेली 18 वर्षे सरकारी पदावर काम केल्यानंतर आज मी या पदाचा राजीनामा दिला आहे. एवढ्या वर्षात मी बिहारला माझ्या आणि माझ्या कुटुंबापेक्षा वरचढ मानले आहे. सरकारी कर्मचारी असताना माझ्या कार्यकाळात काही चूक झाली असेल तर मी त्याबद्दल माफी मागतो. मी भारतीय पोलीस सेवेचा (आयपीएस) राजीनामा दिला आहे, पण मी बिहारमध्येच राहीन आणि भविष्यातही बिहार हेच माझे कार्यस्थान राहील.

Shivdeep Lande Prashant Kishor
Gopichand Padalkar : 'मनोज जरांगेंनी डाॅक्टर बदलला पाहिजे', गोपीचंद पडळकरांचा टोला

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com