NCP Vs Nitesh Rane : राणेंविरोधात NCP ची नाराजी वाढली; दिल्लीतील तक्रारीनंतर आता फडणवीसांना पत्र; कठोर कारवाई होणार?

Ajit Pawar NCP MLA Satish Chavan Letter to DCM Devendra Fadnavis : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार सतीश चव्हाण यांनी नितेश राणेंवर मुस्लिम समाजाबद्दल आणि त्यांच्या धार्मिक स्थळाबाबत वादग्रस्त वक्तव्यं करत धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याचंही पत्रात म्हटलं आहे.
Nitesh Rane And NCP .jpg
Nitesh Rane And NCP .jpgSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: गेल्या दिवसांपासून राजकीय नेतेमंडळींकडून वादग्रस्त विधानांवर विधानं केली जात आहे. यात सत्ताधारी महायुतीतील नेतेमंडळी आघाडीवर आहेत.महायुतीतील सर्वात मोठा घटक पक्ष असलेल्या भाजपमधील आमदार आणि नेते नितेश राणे यांच्याकडून सातत्याने धार्मिक तेढ निर्माण केली जाणारे चिथावणीखोर वक्तव्यं केली जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. महायुतीतीलच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटही राणेंच्या वादग्रस्त व आक्रमक विधानांमुळे नाराज असून थेट यांविरोधात त्यांनी दिल्लीदरबारी तक्रार केली असल्याचेही समोर येत आहे.

दिल्लीतील तक्रारीनंतर काही तासांतच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार सतीश चव्हाण यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच याविषयी पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) वारंवार धार्मिक द्वेष वाढवणारी करणारी वक्तव्ये करत आहेत.त्यामुळे त्यांच्या वक्तव्याची चौकशी करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी,अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे. यामुळे नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.

आमदार सतीश चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना लिहिलेल्या पत्रात आमदार राणे यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश द्यावेत.तसेच भाजपच्या शीर्ष नेतृत्वाने देखील त्यांच्या समाजविघातक वक्तव्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी,असं म्हटलं आहे.

चव्हाण पत्रात काय म्हणतात..?

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार सतीश चव्हाण यांनी नितेश राणेंवर मुस्लिम समाजाबद्दल आणि त्यांच्या धार्मिक स्थळाबाबत वादग्रस्त वक्तव्यं करत धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याचंही पत्रात म्हटलं आहे.

Nitesh Rane And NCP .jpg
Maharashtra Assembly Election : भाजप चुका सुधारणार की पुन्हा मोदींवरच विसंबून राहणार?

महाराष्ट्रात दोन महिन्यांत विधानसभा निवडणुका होत आहेत.अशा परिस्थितीत पार्श्वभूमीवर केवळ स्वत:चे राजकारण करण्यासाठी राणे सातत्याने वादग्रस्त वक्तव्ये करत आहेत.त्यांच्याविरोधात मुस्लिम समाजात संतापाची भावना आहे.असून दोन समाजांत धार्मिक तेढ निर्माण होईल, अशी सामाजिक परिस्थिती तयार होण्याची शक्यता आहे.

सामाजिक परिस्थिती तयार होण्याची शक्यता आहे. त्यातून गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते,अशी चिंता सतीश चव्हाण यांनी फडणवीसांना लिहिलेल्या पत्राव्दारे व्यक्त केली आहे.

देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया..?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार गटाने दिल्लीतील भाजप नेत्यांकडे नितेश राणेंविरोधात केलेल्या तक्रारीवर भाष्य केले.ते म्हणाले, भाजप आमदार नितेश राणे हिंदुत्ववादी आहेत.त्यांच्या वक्तव्याचा कधी कधी वेगळा अर्थ निघतो,नारायण राणे आणि मी त्यांच्याशी चर्चा केली केली असून त्यांना वादग्रस्त वक्तव्य टाळण्याचा सल्ला दिला आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

याचवेळी त्यांनी नितेश राणे यांच्याशी त्यांचे वडील नारायण राणे आणि मी सुद्धा बोललेलो आहे. त्यांना असे वक्तव्यं टाळण्याचा सल्ला दिला आहे.यापुढे ते काळजी घेतील असंही फडणवीस यांनी सांगितले.

Nitesh Rane And NCP .jpg
Shikhar Paharia : सुशीलकुमार शिंदेंच्या नातवाच्या उमेदवारीबाबत कुटुंबीयांनी दिली मोठी अपडेट....

अजितदादांना कुठे तक्रार करायची आहे, तिथे करु देत..

तर भाजप आमदार नितेश राणेंनीही राष्ट्रवादी काँग्रेसची तक्रार गांभीर्याने घेतली नसल्याचे दिसून येत आहे ते म्हणाले, अजितदादा यांना कुठे तक्रार करायची आहे ती करावी. पण आपण हिंदुत्वाशी तडजोड करणार नाही.अजितदादा यांनी विसर्जन मिरवणुकीवरील दगडफेकीचा एकदा तर निषेध करायला हवं होतं. मग अशी वेळ आली नसती, असं नितेश राणे म्हणाले.

Nitesh Rane And NCP .jpg
Ashok Pawar News : शिरुरमध्ये राजकारण तापलं; घोडगंगा साखर कारखान्याच्या सभेत राडा, 'अशोक पवार चोर है'च्या घोषणा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com