IAS : विधासभा निवडणूक लढवता येईना; सरकारकडून छळ! IAS अधिकाऱ्याचे मोदी सरकारवर गंभीर आरोप

IAS Officer: एका IAS अधिकाऱ्याचा सरकारकडून जाणीवपूर्वक छळ सुरु असल्याचा आरोप खुद्द या अधिकाऱ्यानं केला आहे.
Narendra Modi
Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

IAS Officer Kannan Gopinathan: एका IAS अधिकाऱ्याचा केंद्र सरकारकडून छळ सुरु असल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे. विधानसभा निवडणूक लढवण्याचा या अधिकाऱ्याचा मानस आहे. पण सरकारच्या छळवणुकीमुळं ही निवडणूकही आपल्याला लढवता येत नाहीए, असंही या अधिकाऱ्यानं म्हटलं आहे.

Narendra Modi
Farmer's Income: शेतकऱ्यांच्या उत्पन्नात ८ टक्के वाढ! मोदी सरकारचा मोठा दावा; पण वास्तव काय?

कोण आहे हा IAS अधिकारी?

मूळचे केरळचे रहिवासी असलेले कन्नन गोपिनाथन यांनी सरकारवर आरोप केले आहेत. गोपिनाथन यांनी आपल्या सोशल मीडियातील पोस्टद्वारे केंद्र सरकारकडून आपला छळ सुरु असल्याचा गंभीर आरोप केला आहे. या अधिकाऱ्यानं २०१९ मध्ये आपल्या पदाचा राजीनामा देत प्रशासकीय सेवेतून बाहेर पडत राजकारणात करिअर करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर त्यांनी २०२५ मध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश केला. आता केरळची विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे, ही निवडणूक लढवण्याची तयारी कन्नन यांनी केली होती. पण केंद्र सरकारच्या अडमुठ्या धोरणामुळं त्यांना ही निवडणूक लढवण शक्य नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

नेमकं प्रकरण काय?

कन्नन गोपिनाथन यांनी सोशल मीडियात पोस्ट लिहून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात ते म्हणतात की,

प्रिय PM,

मला केवळ तुमचं लक्ष याबाबीकडं वेधून घ्यायचं आहे की, आपल्या सरकारनं गेल्या ६.५ वर्षांपासून माझ्या राजीनाम्यावर कोणतीही कारवाई करण्यास नकार दिला आहे. असं असतानाही मला पगारही मिळत नाहीए आणि मला सेवामुक्तही करण्यात आलेलं नाही. यामुळं मी माझ्या करिअरमध्ये पुढे जाऊ शकत नाही. त्याचबरोबर मी केरळमध्ये विधानसभा निवडणूक लढवण्यापासून वंचित राहिलो आहे. हा एक प्रकारचा सरकारी छळ असून दुसरं काहीही नाही.

मी माझ्या खासगी जीवनाचा उल्लेख न करण्याचं ठरवलं होतं कारण मी या गोष्टीनं चांगल्या प्रकारे भान आहे की, तुमच्या शासन काळात लाखों नागरिकांना कशा पद्धतीनं अडचणींचा समाना करावा लागतो आहे.

पण राजीनामा देणं आणि लोकशाहीच्या प्रक्रियेत सहभाग नोंदवण्याचा माझा अधिकार रोखणं हे खूपच लाजीरवानं आणि घाणेरडी बाब आहे. त्यामुळं सरकारनं आपला हा भेदभावाचा उद्योग बंद करावा. तसंच आपल्या सुस्त पडलेल्या सरकारला निर्देश द्याल की त्यांनी माझ्या राजीनाम्यावर तात्काळ कारवाई करावी.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com