Nitish Kumar : नितीश कुमारांचा उत्तराधिकारी कोण? मुलगा नव्हे ‘या’ निवृत्त IAS चे नाव चर्चेत...

Bihar Chief Minister, Manish Verma, Successor : बिहार उत्तर प्रदेशसह बहुतेक राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांच्या प्रमुखांनी आपल्या उत्तराधिकाऱ्यांकडे पक्षाची सूत्रं सोपवली आहेत.
Nitish Kumar, Manish Verma
Nitish Kumar, Manish VermaSarkarnama
Published on
Updated on

Patna : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे वय सत्तरीपार गेले आहे. मात्र, त्यांनीही अजूनही आपला राजकीय उत्तराधिकारी कोण असेल, याबाबत मौन बाळगले आहे. बहुतेक राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांच्या प्रमुखांनी आपल्या कुटुंबातील सदस्याकडेच पक्षाची सुत्रे दिली आहेत. पण नितीश कुमार याबाबतीत वेगळे ठरण्याची शक्यता आहे.

नितीश कुमार यांचा उत्तराधिकारी कोण, या प्रश्नाचे उत्तर लवकरच मिळण्याची शक्यता आहे. ते आपल्या कुटुंबातील सदस्याला नव्हे तर माजी आयएएस अधिकाऱ्याला पसंती देणार असल्याची चर्चा आहे. निवृत्त आयएएस अधिकारी मनीष वर्मा यांचे नाव आघाडीवर आहे.

कोण आहेत मनीष वर्मा?

मनीष वर्मा हे 2000 च्या तुकडीतील आयएएस अधिकारी होते. त्यांनी 2018 मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. नितीश कुमार यांच्या सांगण्यावरून त्यांनी हे पाऊल उचलल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती. निवृत्तीनंतर ते नितीश कुमारांसाठी काम करत होते. ते जेडीयूचे सदस्य बनले असून महासचिव (संघटन) ही जबाबदारी सोपवली जाऊ शकते. मागील वर्षभरापासून ते कोणत्याही पदाशिवाय संघटनात्मक काम करत आहेत.

Nitish Kumar, Manish Verma
Rahul Gandhi Vs Ashwini Vaishnaw : मोदींचे ‘लोको पायलट’ राहुल गांधींवर बरसले; सगळंच खोडून काढलं...

वर्मा हे बिहारमध्ये पटना आणि पूर्णिया जिल्ह्याचे जिल्हाधिकारीही होते. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणनीती ठरवण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यांनी जेडीयूचे उमेदवार असलेल्या 16 मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले होते. त्यापैकी 12 मतदारसंघात पक्षाला विजय मिळाला. त्यामुळे जेडीयूचे केंद्र सरकारमध्ये वजन वाढले.

वर्मा यांना जेडीयूमध्ये अधिकृत प्रवेश देत नितीश कुमारांनी पक्षांतर्गत विरोधकांना संदेश दिल्याचे मानले जात आहे. पक्षाचे कार्य़कारी अध्यक्ष संजय झा यांच्याकडे त्यांचा रोख असल्याचे मानले जाते. नितीश कुमार यांचे विश्वासू आरसीपी सिंह हे पक्षाला सोडून गेले आहेत. ते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. तसेच केंद्रात मंत्रीही होते. नितीश यांच्यानंतर त्यांचाच पक्षात क्रमांक होता. त्यांची जागा आता वर्मा घेणार असल्याची चर्चा आहे.

Nitish Kumar, Manish Verma
Video Nitish Kumar : नितीश कुमारांचा पारा चढला; स्टेजवरच अधिकाऱ्याचे पाय धरण्यासाठी उठले अन्...

मुलगा राजकारणापासून दूर

नितीश कुमार यांचे पुत्र निशांत कुमार हे राजकारणापासून चार हात लांब आहेत. ते कधीही वडिलांसोबत सार्वजनिक व्यासपीठावर दिसत नाहीत. तसेच निवडणुकीच्या राजकारणातही ते नसतात. त्यामुळे त्यांच्याकडे कधीही राजकीय वारसदार म्हणून पाहिले गेले नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com