Tejashwi Yadav : ... ते तर योगींचे चायनीज व्हर्जन! तेजस्वी यादवांच्या टीकेवर भाजप नेते भडकले...

Yogi Adityanath BJP Himata Biswa Sarma Amit Malviya : तेजस्वी यादव यांच्या विधानानंतर भाजपच्या आय़टी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.
Tejashwi Yadav, Yogi Adityanath
Tejashwi Yadav, Yogi AdityanathSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : आसाम विधानसभेतील कर्मचाऱ्यांना नमाजासाठी दिली जाणारी सुट्टी रद्द केल्याचा मुद्दा चांगलाच तापला आहे. त्यावरून राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर निशाणा साधताना जिव्हारी लागणारी टीका केली आहे. भाजप नेत्यांनी त्यावर पलटवार केला आहे.

नमाजाच्या मुद्यावरून तेजस्वी यांनी दोन दिवसांपूर्वी एक्सवर एक पोस्ट केली होती. त्यामध्ये म्हटले होते की, आसामचे मुख्यमंत्री स्वस्तातली लोकप्रियता मिळवण्यासाठी आणि योगींचे चायनीज व्हर्जन बनण्यासाठी जाणीवपूर्वक मुस्लिमांना त्रास देणारी कृती करत असतात. भाजपच्या लोकांनी मुस्लिमांना सॉफ्ट टार्गेट बनवले आहे.

Tejashwi Yadav, Yogi Adityanath
Ripun Bora : ममतांना मोठा धक्का; बड्या नेत्याने पक्षाला ठोकला रामराम

यादव यांनी या विधानाचा शनिवारीही पुनर्रुच्चार केला. यावेळी त्यांनी सरमा यांना उद्देशून चायनीज रिप्लिका असे म्हटले आहे. ‘एएनआय’शी बोलताना ते म्हणाले, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बुलडोझर वापरत आहेत. तर आसामचे सीएम नमाज रोखण्याचे काम करत आहे. हा देश सर्वांचा आहे. इथे शांती असायला हवी. पण हे लोक विद्वेष पसरवत असल्याची टीका योगींनी केली.

सरमा यांनी तेजस्वी यांच्या विधानाला फारसे महत्व न देता बोलणे टाळले. टीका करणे हे लोकांचे काम आहे. त्याआधारावर आपले काम थांबू शकत नाही. पुढे जात राहणे, हे आमचे काम असल्याचे सरमा म्हणाले. भाजपच्या आयटीच सेलेचे प्रमुख अमित मालवीय यांनीही पलटवार केला आहे.

मालवीय यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे की, तेजस्वी यादव यांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांना चायनीज व्हर्जन म्हणणे धोकायादक आणि भेदभावपूर्ण तसेच पुर्वेकडील लोकांचा अपमान करणार आहे.

Tejashwi Yadav, Yogi Adityanath
Gangrape Case : गँगरेपच्या आरोपीला भाजप आमदाराने भरवला केक; फोटो सोशल मीडियात व्हायरल

तेजस्वी यादव यांची बेजाबाबदार टीकेमुळे पुर्वेकडील लोकांविरोधात हिंसे वाढण्याची भीती आहे. यादव यांनी आपल्या विधानांबाबत सावधान राहायला हवे. आपली बौध्दिक क्षमतेबाहेरील गोष्टींवर भाष्य करू नये, असा टोलाही मालवीय यांनी लगावला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com