

Court News : केरळमधील कन्नूर जिल्ह्यात २०१६ मध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते सी. व्ही. धनराज यांच्या झालेल्या खूनप्रकरणी न्यायालयाने बुधवारी भाजप आणि रा. स्व. संघाच्या तीन कार्यकर्त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावत प्रत्येकी पाच लाख रुपयांचा दंड ठोठावला.
या प्रकरणातील अन्य १६ आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली, तलिपरंबा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश के. एन. प्रशांत यांनी टी. पी. बिजू (वय ३४), एम. विपिन (३४) आणि एम. वैशाख (३१) या तिघांना २३ नोव्हेंबर रोजी दोषी ठरवले होते. हे तिघेही भाऊ आहेत.
दंड संहितेच्या 'कलम ३०२' अंतर्गत त्यांना जन्मठेप सुनावण्यात आली. या कटात सहभागाचा संशय असलेल्या १६ आरोपींच्या निर्दोष मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान दिले जाणार आहे. या खटल्यात ४३ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली.
एझिमाला येथील सीपीआयचे माजी शाखा सचिव आणि डीवायएफचे नेते धनराज यांची 2016 मध्ये निर्घृणपणे हत्या झाली होती. त्यांच्या निवास्थानीच आरोपींनी घरात घुसून त्यांची हत्या केली. त्यांच्या आई आणि पत्नीसमोरच हा प्रकार घडला. त्यांची साक्ष या प्रकरणात महत्त्वाची ठरली.
धनराज यांच्यावर 37 वार करण्यात आले होते. राजकीय हेतूने ही हत्या करण्यात आलाचा युक्तिवाद त्यांच्या कुटुंबीयांच्या वकिलाकडून करण्यात आला होता. त्यानंतर न्यायाधीशांनी या प्रकरणी तिघांना आरोपी ठरवत त्यांना जन्मठेप सुनावली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.