BJP Politics : लोकसभा मतदारसंघ पुनर्रचनेचे संकेत? रत्नागिरीत समीकरणे बदलण्याची शक्यता; भाजपने उचलले मोठे पाऊल, मोर्चेबांधणी वेग

Konkan Lok Sabha Delimitation Buzz : आगामी काळात देशात होणाऱ्या संभाव्य लोकसभा मतदारसंघ पुनर्रचनेच्या चर्चेने कोकणातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
Lok Sabha
Lok SabhaSarkarnama
Published on: 
Updated on: 

Ratnagiri News : आगामी काळात देशात होणाऱ्या संभाव्य लोकसभा मतदारसंघ पुनर्रचनेच्या चर्चेने कोकणातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या पुनर्रचनेमुळे कोकणातील मतदारसंघांची भौगोलिक आणि राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा संभाव्य बदल आणि रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे वाढते महत्त्व लक्षात घेऊन भारतीय जनता पक्षाने आतापासूनच संघटनात्मक बांधणीला वेग दिला आहे.

राजकीय जाणकारांमधील प्राथमिक चर्चेनुसार, आगामी पुनर्रचनेत लोकसभा मतदारसंघांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. या प्रक्रियेत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांची मोठी फेररचना होऊ शकते. चर्चेतील आराखड्यानुसार, रत्नागिरी, चिपळूण, दापोली आणि गुहागर या विधानसभा मतदारसंघांचा मिळून एक स्वतंत्र 'रत्नागिरी लोकसभा मतदारसंघ' तयार होऊ शकतो.

दुसरीकडे रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा, राजापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघ एकत्र करून 'सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ' आकाराला येण्याची शक्यता आहे. तसेच, मंडणगड आणि खेडचा काही भाग रायगड मतदारसंघाला जोडला जाऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Lok Sabha
BJP Politics : भाजपला पराभवाची भीती? घेतला मोठा निर्णय; 'ते' मंत्री मैदानात उतरणार!

या संभाव्य बदलांची चाहूल लागताच भाजपने तळागाळातील संघटना भक्कम करण्याचे पाऊल उचलले आहे. दोन दिवसांपूर्वी डोंबिवली येथे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर जिल्ह्यातील संघटनात्मक नियुक्त्यांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. गेल्या काही काळापासून पक्षाच्या दैनंदिन कार्यक्रमांपासून काहीसे दूर राहिलेल्या अनुभवी पदाधिकाऱ्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणून संघटनेला नवी ऊर्जा देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे.

Lok Sabha
BJP Politics In Shirur : शिरूरमध्ये विरोधकांचा 'गेम ओव्हर'! भाजप सत्तेत, सत्तेची दोन्ही महत्त्वाची पदे पाचर्णे कुटुंबाकडे; नगरपरिषदेत विरोधकच उरला नाही

संघटन मजबुतीवर लक्ष

रत्नागिरी मतदारसंघात भाजपची मोठी पारंपरिक मतपेढी असल्याचे स्थानिक नेत्यांनी सांगितले. आगामी काळातील संभाव्य पुनर्रचना आणि निवडणुका लक्षात घेता, जुन्या नेत्यांचा अनुभव आणि नव्या कार्यकर्त्यांची ताकद यांची सांगड घालून संघटना अधिक मजबूत करण्याचे उद्दिष्ट भाजपने ठेवले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.