दिशा सॅलियन प्रकरण : नारायण राणे तर अडकले पण सोबत चंद्रकांतदादांनाही घेतलं...

Disha Salian | Narayan Rane | Chndrakant Patil : नारायण राणेंना दुजोरा देणे चंद्रकांत पाटील यांना भोवणार
Narayan Rane - Chandrakant Patil
Narayan Rane - Chandrakant Patil Sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : दिशा सॅलियन आत्महत्या प्रकरणात मोठा खुलासा समोर आला असून यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि आमदार नितेश राणे यांच्यावर मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी दिशा सॅलियनवर लैंगिक अत्याचार झाले असल्याचा आरोप आधी नारायण राणे आणि नंतर नितेश राणे यांनी केला होता. मात्र दिशाच्या कुटुंबियांनी हे आरोप फेटाळून लावत व्यवसायामधील तणावामुळे दिशाने आत्महत्या केल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर तिच्या आई-वडिलांनी राज्य महिला आयोगाकडे याबाबत केली होती तक्रार केली होती.

याच तक्रारीनुसार महिला आयोगाने पोलिसांना चौकशीचे आदेश दिले होते. याबाबतचा अहवाल आता पोलिसांनी महिला आयोगाला दिला असून अहवालात दिशा सॅलियनच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच ती गरोदर नव्हती असेही समोर आले आहे. यानंतर आता दिशा सॅलियनची बदनामी करणे राणे पिता-पुत्रांच्या अंगलटी आले आहे. याबाबत आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी २४ तासात कारवाई करण्याचे आदेश दिले असून यात त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावरही कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

Narayan Rane - Chandrakant Patil
दिशा सॅलियन प्रकरणात मोठा खुलासा; नारायण राणेंसह नितेश यांच्यावरही गुन्हा दाखल

रुपाली चाकणकर यांनी काय आदेश दिले आहेत?

याबाबतच्या आदेशात त्या म्हणाल्या, दिवंगत दिशा सॅलियनची बलात्कार करून हत्या करण्यात आली आहे असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले होते. तिच्या शवविच्छेदन अहवालानुसार तिच्यावर बलात्कार झालेला नसून ती गरोदर सुद्धा नव्हती हे मालवणी पोलिसांनी राज्य महिला आयोगाला दिलेल्या अहवालात स्पष्टपणे नमूद केले आहे.

त्यामुळे मृत्यूपश्चात देखील होत असलेल्या आपल्या मुलीच्या बदनामीमुळे व्यथित झालेल्या दिशा सॅलियनच्या आई-वडिलांनी या संदर्भात दिशाच्या मृत्यूबाबत खोटी व बदनामीकारक माहिती देणाऱ्या नारायण राणे, नितेश राणे व संबंधित सर्व व्यक्तींवर कारवाई करावी, तसेच दिशाबद्दल समाजमाध्यमावर नमूद असलेली चुकीची व बदनामीकारक माहिती काढून टाकण्यात यावी अशी तक्रार आई वसंती सॅलियन व वडील सतीश सॅलियन यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे केली आहे.

यानुसार दिशाच्या मृत्यूबाबत कोणतेही पुरावे नसताना नारायण राणे यांच्यावर मृत्यूपश्चात तिचे चारित्र्यहनन करणे, प्रतिष्ठा मलिन करणे, तिची व कुटुंबाची बदनामी करणे त्याचबरोबर दिशाच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय यंत्रणेमार्फत सुरु असल्याची खोटी विधाने करून मुंबई पोलिसांच्या तपास यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर अविश्वास दाखवून दबाव निर्माण करून समाजामध्ये संभ्रम निर्माण करणे या कृत्याबाबत नारायण राणे यांच्याविरुद्ध तसेच त्यांनी केलेल्या आरोपांना माध्यमांवरून दुजोरा देणारे नितेश राणे व चंद्रकांत पाटील यांच्यावर तात्काळ फौजदारी कारवाई करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल राज्य महिला आयोगास २४ तासांच्या आत सादर करण्याचे निर्देश वरिष्ठ पोलीस निरीक्षक , मालवणी पोलीस स्टेशन यांना दिले आहेत.

तसेच दिशा सॅलियन मृत्यू प्रकरणी समाज माध्यमावर तयार करण्यात आलेले लाखो खोटे अकाउंट्स बंद करून तिच्याबद्दल नमूद असलेली खोटी माहिती तात्काळ काढून टाकण्यात यावी आणि अर्जदार श्रीमती व श्री. सॅलियन या जेष्ठ नागरिक असलेल्या दाम्पत्याला शांततेने व सुरक्षित जगता यावे याकरिता योग्य ती सुरक्षात्मक उपाययोजना करावी व अर्जदारांच्या मागणीनुसार या प्रकरणी योग्य ती चौकशी करून कारवाई करावी.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com