Rajasthan Politics : पायलट यांचा बंडाचा इशारा ठरलं कपातलं वादळ; नव्या पक्षाची शक्यता हवेतच विरली !

Sachin Pilot On Rajasthan Politics : स्वच्छ राजकारणाची नवी घोषणा..
Rajasthan Politics : sachin pilot
Rajasthan Politics : sachin pilotSarkarnama
Published on: 
Updated on: 

National News : काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी काँग्रेसचे दिवंगत नेते तथा आपले वडील राजेश पायलट यांच्या पुण्यतिथीनिमित्त दौसा येथे एक मोठे कार्यक्रम आयोजित केले होते. यावेळी त्यांना उपस्थित जनसमुदायाला संबोधित केले. मात्र यावेळी नव्या पक्षाच्या घोषणेबाबत सुरू असलेल्या शक्यतेबाबत पायलट यांनी कोणतीही घोषणा केली नाही. त्यांनी राजस्थानमध्ये ‘स्वच्छ राजकारण’ करण्याची हाक दिली.

Rajasthan Politics : sachin pilot
LIVE : Again Demonetisation २०००च्या नोटा बंद, आता पुढे काय ? | RBI | Narendra Modi | Big Breaking

सचिन पायलट म्हणाले, राजस्थानमधील तरुणांच्या चांगल्या भविष्यासाठी मी नेहमी बोलत आलो आहे. येथील जनतेने मला नेहमीच पाठिंबा दिला आहे. आपला आवाज कमजोर नाही, मी मागे हटणार नाही. देशाला सत्याच्या राजकारणाची गरज आहे. माझे धोरण स्पष्ट आहे, मला 'स्वच्छ राजकारण' हवे आहे.

दिवंगत राजेश पायलट यांच्या पुण्यतिथीनिमित्त स्थानिक वसतिगृहात त्यांच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले. यासोबतच अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमापूर्वी पायलटच्या समर्थकांनी राजस्थानच्या निवडणुकीसाठी सहा महिन्यांत नवीन पक्ष सुरू करण्याची शक्यता नाकारली. सचिन पायलटने मात्र या संपूर्ण प्रकरणावर मौन बाळगून आहेत.

Rajasthan Politics : sachin pilot
BJP will contest News : हिंगोली, छत्रपती संभाजीनगर लोकसभा भाजप लढवणार ? केंद्रीय मंत्र्यांचे संकेत..

राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्या पुढील राजकीय डावपेचाबाबत सुरू असलेल्या शक्यतांच्या दरम्यान काँग्रेसने शनिवारी या प्रकरणावर सकारात्मक तोडगा निघेल अशी आशा व्यक्त केली होती. राजस्थानमधील राजकीय घडामोडींबाबत विचारले असता काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनाते म्हणाल्या की, आमचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि आम्हाला विश्वास आहे की या प्रश्नावर सकारात्मक तोडगा निघेल.

Rajasthan Politics : sachin pilot
Lalu Prasad Yadav Birthday : 76 वर्षांचे झाले लालू प्रसाद यादव, 'असा' केला वाढदिवस साजरा; पाहा खास फोटो!

काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी काल म्हंटले होते की, 'पायलट हे पक्ष सोडून स्वतःचा पक्ष काढतील या सर्व अफवा आहेत. काँग्रेस अध्यक्ष आणि आमचे नेते राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्याशी चर्चा केली आणि त्यानंतर आम्ही एकजुटीने निवडणूक लढवू असे सांगितले होते, ही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.