संजय राऊत आणि नवनीत राणा एकाच वेळी लेह-लदाखच्या दौऱ्यावर : प्रकाश जावेडकरही सोबत

Sanjay Raut | Navneet Rana | : शिवसेना - राणा दाम्पत्य संघर्षामध्ये एक लक्षणीय दौरा
navneet rana, Sanjay Raut Latest Marathi  News, Sanjay Raut on Navneet Rana
navneet rana, Sanjay Raut Latest Marathi News, Sanjay Raut on Navneet Rana sarkarnama
Published on
Updated on

(Navneet rana, Sanjay Raut Latest Marathi News)

मुंबई : हनुमान चालीसेवरुन महाराष्ट्रात सध्या महाविकास आघाडीविरुद्ध राणा दाम्पत्य असा संघर्ष चांगलाच चिघळळा आहे. खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) या दाम्पत्याला झालेल्या अटकेनंतर हा मुद्दा संघर्ष आणखी तीव्र झाला. अशातच तुरूंगातून बाहेर पडल्यानंतर राणा दाम्पत्याने थेट दिल्ली गाठली आहे. तिथं पत्रकार परिषदा, माध्यमांना मुलाखती देत दोघेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधत आहेत.

याशिवाय दिल्लीत जावून खासदार राणा यांनी लोकसभा अध्यक्षांकडे शिवसेना नेते संजय राऊत आणि महाविकास आघाडी सरकारची तक्रार केली आहे. नवनीत राणांनी या प्रकरणी लोकसभा अध्यक्षांना पत्रही लिहिले होते. महाराष्ट्र सरकारने अन्याय केला असून, लोकप्रतिनिधीला चुकीची वागणूक दिल्याचा आरोप राणा दांपत्याने केला आहे.

याच संघर्षादरम्यान आता खासदार राऊत आणि खासदार राणा हे दोघेही एकाच वेळी लेह दौऱ्यावर गेले आहेत. संसदेच्या परराष्ट्र व्यवहार समितीच्या अभ्यास दौऱ्यावर हे दोन्ही खासदार गेले आहेत. पी.पी. चौधरींच्या नेतृत्वात काल पासून हा दौरा सुरु झाला असून पुढील ४ दिवस हा दौरा सुरु राहणार आहे. याशिवाय महाराष्ट्रातून या दौऱ्यावर माजी केंद्रीय मंत्री आणि राज्यसभा खासदार प्रकाश जावडेकर यांचाही समावेश आहे. त्यामुळे आता हनुमान चालीसाच्या गरमा-गरम वादानंतर काश्मीर खोऱ्याच्या थंडगार वातावरणात तणाव निवळणार का असा सवाल विचारला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com