IAS Pooja Khedkar Update : IAS पूजा खेडकर यांची छळवणुकीची तक्रार पुणे पोलिसांकडे वर्ग !

Pooja Khedkar Vs Suhas Diwase : जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी याबाबतचा अहवाल तयार करून राज्य शासनाकडे पाठवला होता. त्यामध्ये पूजा खेडकर यांना इतर जिल्ह्यात प्रशिक्षणासाठी पाठवावे, अशी विनंती केली होती.
IAS Pooja Khedkar-Suhas Diwase
IAS Pooja Khedkar-Suhas DiwaseSarkarnama
Published on
Updated on

Pune News : वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर यांनी वाशिम येथील पोलिसांकडे पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या विरोधात छळवणुकीची तक्रार दाखल केली होती. ही तक्रार आता वाशिम पोलिसांकडून पुणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आली आहे. या तक्रारीची शहानिशा करत याचा तपास आता पुणे पोलिसांकडून केला जाणार आहे.

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातून वाशिम जिल्ह्यात प्रशिक्षणासाठी बदली करण्यात आलेल्या प्रोबेशनरी आयएएस अधिकारी पूजा खेडकर या गेल्या काही दिवसांपासून चांगल्याच चर्चेत आल्या आहेत.

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी केलेल्या 'प्रतापा' मुळे त्यांची वेगवेगळ्या विभागांकडून चौकशी सुरु करण्यात आली आहे. पुणे जिल्हाधिकारी (Collector) कार्यालयात प्रशिक्षणासाठी असताना त्यांनी आपल्या खासगी ऑडी कारवर लाल-निळा हा अंबर दिवा बेकायदेशीर पद्धतीने लावला होता.

IAS Pooja Khedkar-Suhas Diwase
Pooja Khedkar News : मोठी बातमी! पूजा खेडकरांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांवर केला गंभीर आरोप, म्हणाल्या...

याबरोबरच जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याचे अँटी चेंबर ताब्यात घेत त्यांचे सामान बाहेर काढले होते. आयएएस (IAS) अधिकारी असतानाही आवश्यक त्या दर्जाच्या सोयीसुविधा मिळत नसल्याने खेडकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांना कडक शब्दात समज देखील दिली होती. खेडकर यांच्याकडून होत असलेल्या या त्रासाची तक्रार अधिकारी आणि कर्मचारी यांनी जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याकडे केली होती.

यानंतर सुहास दिवसे यांनी याबाबतचा अहवाल तयार करून राज्य शासनाकडे पाठवला होता. त्यामध्ये पूजा खेडकर यांना इतर जिल्ह्यात प्रशिक्षणासाठी पाठवावे, अशी विनंती केली होती. या अहवालाची दखल घेत राज्य शासनाने पूजा खेडकर यांची वाशिम येथे प्रशिक्षणासाठी बदली केली होती. त्यांनी केलेल्या उद्योगांमुळे केंद्र सरकारने खेडकर यांचे ट्रेनिंग तातडीने रद्द करुन त्यांना पुन्हा मसुरी येथे परत बोलविले आहे.

IAS Pooja Khedkar-Suhas Diwase
Pooja Khedkar : ‘हे’ तीन नियम ठरवणार IAS पूजा खेडकर यांचे भवितव्य…

वाशीम येथे कार्यरत असताना आयएएस पूजा खेडकर यांनी वाशिम पोलिसांशी संपर्क साधून पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या विरोधात एक तक्रार दाखल केल्याचे समोर आलं आहे. जिल्हाधिकारी दिवसे यांच्याकडून छळवणूक झाल्याचे या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

वाशिम पोलिसांनी ही तक्रार पुणे पोलीसांकडे वर्ग केली आहे. पुणे पोलिस याच्या कायदेशीर बाबी तपासत आहेत. पुणे पोलिसांकडून अद्याप या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. पोलिस सर्व गोष्टी तपास करून पुढचा निर्णय घेणार आहेत.

पोलिस घेतायेत खेडकर कुटुंबियांचा शोध

दरम्यान, पूजा खेडकर यांच्या आई-वडिलांवर देखील मुळशी येथे स्थानिकांना धमकावल्याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच गुन्ह्याच्या तपासासाठी खेडकर कुटुंबाचा पुणे ग्रामीण पोलिसांकडून शोध सुरु करण्यात आला आहे.

मात्र खेडकर कुटुंबाशी संपर्क होत नसल्याच पुणे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. खेडकर कुटुंब आणि त्यांच्यासह गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सात जणांचा शोध घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेची तीन पथके तयार केली आहेत.

पौड पोलिसांच्या मदतीने खेडकर कुटुंबाचा शोध घेतला जातोय. या सर्वांचे मोबाईल फोन देखील स्वीच ऑफ असल्याचं पोलीसांनी सांगितले. पुणे पोलिसांनी रविवारी खेडकर कुटुंबाच्या पुण्यातील बाणेर भागातील बंगल्यात जाऊन तपासण्याचा प्रयत्न केला. मात्र बंगल्याचे गेट बंद असल्याचे आढळून आल्यानंतर पोलिसांनी या बंगल्याचे चित्रीकरण केले आहे.

(Edited by : Chaitanya Machale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com