Video Manorama khedkar : मोठी बातमी! IAS पूजा खेडकर यांची आई मनोरमा यांना अटक

Pooja khedkar Manorama khedkar arrested : मनोरमा खेडकर यांनी मुळशीतील शेतकऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवल्या प्रकरणी पौड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
manorama khedkar .jpg
manorama khedkar .jpgsarkarnama
Published on
Updated on

Manorama khedkar News : प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांना पौड पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. मनोरमा खेडकर यांनी मुळशीतील शेतकऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवल्या प्रकरणी पौड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. मात्र, गुन्हा दाखल झाल्यापासून मनोरमा खेडकर आणि त्यांचे पती दिलीप खेडकर हे फरारी झाले होते.

मनोरमा खेडकर या रायगडमधील महाड येथे लपून बसल्या होत्या. याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याप्रमाणे पोलिसांनी फार्म हाऊसवर छापा मारून मनोरमा यांना अटक केल्याची माहिती आहे.

मुळशी तालुक्यातील धडवली गावातील शेतकऱ्यांना मनोरमा खेडकर यांनी बंदुकीचा धाक दाखवला होता. मनोरमा या बंदुक दाखवत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर शेतकऱ्याने दिलेल्या तक्रारीनंतर पौड पोलिस ठाण्यात मनोरमा आणि त्यांचे पती दिलीप खेडकर यांच्यासह पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी Police मनोरमा खेडकर यांना त्यांची बंदुक जमा करण्यासाठी नोटीस देखील बजावली होती.

manorama khedkar .jpg
Solapur NCP Melava : राष्ट्रवादीच्या मेळाव्यातून जयंत पाटील फुंकणार विधानसभेचे रणशिंंग; ‘शहर मध्य अन उत्तर’बाबत काय बोलणार?

गुन्हा दाखल झाल्यानंतर मनोरमा Manorama khedkar या फरार झाल्या होत्या. त्यांच्या शोधसाठी पोलिसांनी मुंबई आणि पाथर्डी येथील त्यांच्या निवासस्थानी छापे टाकले होते. पुण्यातील निवासस्थानी देखील त्यांचा शोध घेण्यात येत होता. अखेर त्यांना महाडमधून पौड पोलिसांनी अटक केली.

पूजा खेडकर यांचा जबाब नोंदवणार

पूजा खेडकर यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी यांच्या आरोप केले होते. त्यासंदर्भात त्यांचा जबाब आज (गुरुवारी) पुण्यात नोंदवण्यात येणार होता. मात्र, पूजा खेडकर अद्यापही वाशिम मध्येच आहेत. त्यांनी जबाब नोंदवण्यासाठी काल (बुधवारी) वाशिमवरून निघणे अपेक्षित होते. मात्र त्या निघाल्या नाहीत. त्यामुळे जबाब नोंदवण्यासाठी पुण्यात त्या उपस्थित राहणार का याबाबत साशंकता आहे. जबाब देण्यासाठी वेळ मागून घेण्याची किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जबाब नोंदवण्याची शक्यता आहे.

manorama khedkar .jpg
Suvendu Adhikari: सुवेंदू यांनी पेटवलेल्या वातीचा धूर भाजपच्या नाका-तोंडात जाणार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com