Satyapal Malik On Modi Government: ..तर 'त्या' केंद्रीय मंत्र्याला राजीनामा द्यावा लागेल; पुलवामा हल्ल्याबाबत सत्यपाल मलिकांचा मोठा खुलासा

National Politics| २०२४ ला जर नरेंद्र मोदींना हटवलं नाही तर ते लोकशाहीच संपवून टाकतील
Satyapal Malik On Modi Govenrment:
Satyapal Malik On Modi Govenrment:Sarkarnama

Satyapal Malik Attacks On Modi Government : पुलवामा हल्ल्यातील शहीद झालेल्या जवानांचे कारण पुढे करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2019 च्या लोकसभा निवडणुका लढवल्या गेल्या. या हल्ल्याची चौकशी झाली तर तत्कालीन गृहमंत्री (राजनाथ सिंह) यांना राजीनामा द्यावा लागेल. या घटनेची मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) माहिती दिली होती, त्यानंतर त्यांनी मला गप्प राहण्यास सांगितले. असा धक्कादायक खुलासा जम्मु काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केला आहे. (Satyapal Malik's big reveal again If there is an inquiry into the Pulwama attack)

Satyapal Malik On Modi Govenrment:
SatyaPal Malik Allegations: पुलवामा हल्ल्यावरून मोदींना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणाऱ्या मलिकांच्या घरी CBI चे पथक दाखल !

सत्यपाल मलिक राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील बन्सूर येथे आयोजित कार्यक्रमात सत्यपाल मलिकांनी (Satyapal Malik) पुलवामा हल्ल्यावरून केंद्रातील मोदी सरकारवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. ''२०२४ ला जर नरेंद्र मोदींना हटवलं नाही तर ते लोकशाहीच संपवून टाकतील, भविष्यात निवडणुकाच होणार नाहीत. पंजाबमधील शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर नरेंद्र मोदी पंजाब दौऱ्यावर निघाले होते, पण वाटेतच काही शेतकरी आंदोलन करत होते. तो हिंसाचार नव्हता. पण यातून आपण जीव वाचला. पण यातून सुखरुप बाहेर पडलो, अशी अफवा पसरवत आहेत. पण हे भित्रे आहेत. ''

''केंद्रातील आठ मंत्री त्यांच्या मंत्रालयातही जात नाहीत. कारण त्यांचे सर्व काम पीएमओ पाहतात. पंतप्रधानांना निरंकुश सत्ता हवी आहे. ते पुलाचे उद्घाटनही करतील. पण त्यांची इच्छा असूनही ते माझे नुकसान करू शकत नाहीत. पण देशातील जनतेला माझी शेवटची विनंती आहे. यावेळी जाती, धर्म विसरून यांच्या विरोधात मतदान करा नाहीतर भविष्यात पुन्हा कधी मतदान करु शकणार नाही.'' (Satyapal Malik News)

Satyapal Malik On Modi Govenrment:
Satyapal Malik : मोदी-शाहांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणाऱ्या सत्यपाल मलिकांचा राजकीय प्रवास आहे तरी कसा !

सत्यपाल मलिक म्हणाले की, 'मी गोव्यात असताना तेथील मुख्यमंत्र्यांच्या भ्रष्टाचाराबाबत मी पंतप्रधान मोदींकडे तक्रार केली होती. पण त्याचा परिणाम असा झाला की मला राज्यपालपदावरून हटवण्यात आले आणि गोव्याचे मुख्यमंत्री मात्र त्यांच्या पदावर कायम राहिले. मला खात्री आहे ते पंतप्रधानांच्या नाकाखाली भ्रष्टाचार करतात आणि त्यात त्यांचाही वाटा आहे आणि बाकीचा अदानीकडे जातो, असा थेट आरोपही सत्यपाल मलिकांनी केला आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com