School Roof Collapse : शाळेचे छत कोसळून 29 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू; 40 जखमी, पाकिस्तानमधील थरकाप उडवणारी घटना!

School roof collapses in Pakistan Peshawar : शाळेचे छत कोसळून 29 विद्यार्थ्यांसह महिला शिक्षिकेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. 40 जण जखमी असून, सहा महिन्यांतील चौथ्या घटनेमुळे शाळांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
school roof collapses in Pakistan Peshawar
school roof collapses in Pakistan PeshawarSarkarnama
Published on: 
Updated on: 

पाकिस्तानमधील पेशावर शहरात एका खासगी शाळेचे छत अचानक कोसळल्याने भीषण दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 29 विद्यार्थ्यांसह एका महिला शिक्षिकेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच सुमारे 40 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, शाळेच्या इमारतींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

पेशावरमधील दिर कॉलनी परिसरातील कॉलेज रोडवर असलेल्या एका खासगी शाळेत ही दुर्घटना घडली. घटना घडली त्यावेळी शाळेत विद्यार्थी आणि कर्मचारी उपस्थित होते. अचानक छत कोसळल्याने अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले. या दुर्घटनेत अनेक लहान मुलांना आपला जीव गमवावा लागला. मृत विद्यार्थ्यांपैकी सर्वच मुले 13 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाची असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे वृत्त आहे.

school roof collapses in Pakistan Peshawar
SIR Supreme Court Hearing : 'इंडिया' आघाडीच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; मुख्य निवडणूक आयुक्तांसह आयोगाला कोर्टाची नोटीस!

बचावकार्य युद्धपातळीवर; जखमींना रुग्णालयात दाखल

घटनेची माहिती मिळताच रेस्क्यू 1122 पथक घटनास्थळी दाखल झाले. बचाव पथकांनी ढिगारा हटवून त्याखाली अडकलेल्या विद्यार्थ्यांना आणि शाळेतील कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

या दुर्घटनेनंतर रुग्णालयात आपत्कालीन परिस्थिती जाहीर करण्यात आली. जखमींवर तातडीने उपचार करता यावेत, यासाठी वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सतर्क करण्यात आले. काही जखमींची प्रकृती गंभीर असून, बचावकार्यादरम्यान ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यावर भर देण्यात आला.

school roof collapses in Pakistan Peshawar
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! 5 केंद्रीय योजनांची नावे बदलली; पाहा संपूर्ण यादी

शाळेच्या इमारतीच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह

या बचाव मोहिमेत लष्कराचे जवान आणि इतर मदत यंत्रणाही सहभागी झाल्याची माहिती आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या विद्यार्थ्यांना आणि कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवण्यात आले.

दरम्यान, शाळेचे छत नेमके कोणत्या कारणामुळे कोसळले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. इमारतीची अवस्था, बांधकामाचा दर्जा आणि देखभालीबाबत तपास होणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com