Russia Slams US : 'अमेरिकेच्या अशा धमक्यांपुढे...', भारत-चीनचा उल्लेख करत रशियाचा डोनाल्ड ट्रम्प यांना इशारा

Russia foreign minister Lavrov on Tariff : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-चीनसह जगभरातील अनेक देशांवर मोठ्या प्रमाणात टॅरिफ लादला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे अनेक देशांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे ट्रम्प यांच्या निर्णयावर अनेक देशांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे.
Russian Foreign Minister Sergei Lavrov criticized Trump’s tariff policies,
Russian Foreign Minister Sergei Lavrov criticized Trump’s tariff policies, stating that India and China will not bow to US trade threats.Sarkarnama
Published on
Updated on

Russia Slams US : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-चीनसह जगभरातील अनेक देशांवर मोठ्या प्रमाणात टॅरिफ लादला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे अनेक देशांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसत आहे.

त्यामुळे ट्रम्प यांच्या निर्णयावर अनेक देशांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे ट्रम्प केवळ टॅरिफ लादण्यावर थांबले नाहीत तर त्यांनी अनेक देशांना धमकीही दिलं. मी सांगेल मी म्हणेन तेच धोरण अवलंबलं पाहिजे अशी हुकुमशाही पद्धत त्यांनी सुरू केल्याचं पाहायला मिळालं.

ट्रम्प यांनी भारतालाही रशियाकडून तेल खरेदी करू नये, असं सांगितलं होतं. शिवाय तेल खरेदी बंद न केल्यास टॅरिफ वाढवणार असल्याचं म्हटलं आणि तसं केलं सुद्धा. अशातच ट्रम्प यांनी नाटो देशांना एक पत्र लिहिन चीन जोपर्यंत रशियाकडून तेल खरेदी करणं थांबवणार नाही आणि युक्रेन-रशिया युद्ध जो पर्यंत थांबत नाही तोपर्यंत चीनवर 50 किंवा 100 टक्के टॅरिफ आकारण्याचं आवाहन केलं होतं.

Russian Foreign Minister Sergei Lavrov criticized Trump’s tariff policies,
Vote Chori: राहुल गांधींना निवडणूक आयोगातच सापडला बिभीषण! मतचोरीच्या आरोपांसाठी दारुगोळा पुरवणारा तो व्यक्ती कोण? शोधाशोध सुरु

याच सर्व घडामोडींवर आता रशियाने अमेरिकाला सुनावलं आहे. शिवाय अमेरिकेचं टॅरिफ युद्ध आता चालणार नाही, भारत आणि चीन अशा धमक्यांपुढे झुकणार नाही, असं म्हणत रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांनी अमेरिकेच्या टॅरिफ धमक्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

सर्गेई लावरोव यांनी म्हटलं की, 'भारत आणि चीन सारखे प्राचीन संस्कृती असलेले देश अशा धमक्यांपुढे झुकणार नाहीत. मला जे आवडत नाही ते करणे थांबवा, नाहीतर मी तुमच्यावर टॅरिफ लावणार, अशा प्रकारची अमेरिकेची भाषा पूर्णपणे चुकीची आहे. यामुळे अमेरिकेचं कामही होणार नाही.

Russian Foreign Minister Sergei Lavrov criticized Trump’s tariff policies,
SEBI On Hindenberg: 'सेबी'चा 'हिंडेनबर्ग'ला दणका, अदानी समूहाला मोठा दिलासा; स्टॉक मॅनिप्युलेशनचे सर्व आरोप फेटाळले

यावेळी अमेरिकेने निवडलेल्या दृष्टिकोनाशी संबंधित नैतिक आणि राजकीय विरोध असल्याचंही रशियाने स्पष्ट केलं आहे. तर अमेरिकेकडून सतत धमक्या येत असतानाही भारत आणि चीनने स्वतःच्या राष्ट्रीय हितांच्या धोरणांना प्राधान्य दिलं.' असं म्हणत त्यांनी भारत-चीनच्या भूमिकेचं कौतुक केलं.

शिवाय अशा अमेरिकेच्या भूमिकेचा अनेक देशांवर आर्थिक परिणाम होतो. त्यांना नवीन बाजारपेठा शोधाव्या लागतात, जास्त किंमत मोजावी लागते आणि अशा धोरणामुळे नैतिक आणि राजकीय प्रतिक्रिया निर्माण होतात, असंही सर्गेई लावरोव म्हणाले. त्यामुळे आता रशियाच्या या भूमिकेवर डोनाल्ड ट्रम्प काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com