Sexual Assault Case : परदेशात पळून गेलेल्या प्रज्वल रेवन्नाची ‘सेक्स स्कँडल’वर पहिली प्रतिक्रिया...

Prajwal Revanna News : महिलांवर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर खासदार प्रज्वल रेवन्ना जर्मनीला गेले आहेत. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासात अडचणी येत असल्याचे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
Prajwal Revanna
Prajwal RevannaSarkarnama

Karnataka News : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत कर्नाटकमध्ये महिलांवरील लैंगिक अत्याचाराचे प्रकरण चांगलेच गाजत आहे. देशभरातील प्रचारसभांमध्ये काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांतील नेत्यांकडून या प्रकरणावरून भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला जात आहे. या प्रकरणातील प्रमुख आरोपी भाजपचा मित्रपक्ष असलेल्या जेडीएसचे प्रमुख, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे नातू खासदार प्रज्वल रेवन्ना हे आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर लगेच ते परदेशात गेले आहेत. आज त्यांनी या प्रकरणावर आपले मौन सौडले आहे.

कर्नाटक (Karnataka) सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (SIT) नेमले असून या पथकाने तपासही सुरू केला आहे. पण त्याआधीच रेवन्ना (Prajwal Revanna) यांनी जर्मनीला पलायन केले आहे. रेवन्ना यांचे तीन हजारांहून अधिक व्हिडिओ एका पेन ड्राईव्हमध्ये असल्याचा दावा भाजपच्याच (BJP) एका नेत्याने केला आहे. तसेच अनेक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत.

Prajwal Revanna
Lok Sabha Election 2024 : फक्त मुस्लिमांनाच जास्त मुलं असतात का? मला 5 आहेत! खर्गेंचा मोदींवर पलटवार

लोकसभा निवडणुकीदरम्यान (Lok Sabha Election) हे प्रकरण बाहेर आल्याने खळबळ उडाली आहे. त्यावर आता प्रज्वल यांची पहिली प्रतिक्रिया आज समोर आली आहे. प्रज्वल यांनी ‘एक्स’वर म्हटले आहे की, चौकशीला हजर राहण्यासाठी मी बेंगलुरूमध्ये नाही. मी माझ्या वकिलांमार्फत सीआयडीला याबाबत कळवले आहे. सत्य लवकरच समोर येईल, असे रेवन्ना यांनी म्हटलं आहे.

 (राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

प्रज्वल यांच्या वकिलांनी सीआयडीला दिलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, ‘प्रज्वल रेवन्ना हे बेंगलुरूच्या बाहेर आहेत. त्यांना नोटिशीबाबत सांगितले आले. त्यांना बेगंलुरूमध्ये चौकशीसाठी हजर राहण्यास सात दिवसांची मुदत हवी आहे.’ एसआयटीने नुकतीच प्रज्वल यांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी नोटीस बजावली आहे.

दरम्यान, प्रज्वल यांना काल जेडीएसमधून निलंबित करण्यात आले आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतरच त्यांना पक्षात पुन्हा घेतले जाईल, असे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी स्पष्ट केले आहे. प्रज्वल यांच्यासह त्यांचे वडील एच. डी. रेवन्ना यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याच घरी काम काम करणाऱ्या महिनेने लैंगिक शोषणाची तक्रार केली आहे.  

Prajwal Revanna
Lok Sabha Election 2024 : काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींनी मागितली भाजपसाठी मतं...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com