Sharad Pawar In Delhi : दिल्लीत पाऊल ठेवताच पवारांनी घेतला मोदींविरोधात आक्रमक पवित्रा

INDIA Vs NDA : मणिपूरवर बोलूच दिले जात नसल्याची केली 'इंडिया'ने तक्रार
Sharad Pawar, Narendra Modi
Sharad Pawar, Narendra ModiSarkarnama
Published on: 
Updated on: 

Delhi News : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टिळक पुरस्काराने सन्मानित केले. यावेळी पवारांनी मोदींचे कौतुक केले, मात्र यानंतर दिल्लीत जाताच पवारांनी मोदींविरोधात आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसून आले. मणिपूर मुद्यावरून सभागृहात बोलू दिले जात नसल्याचा आरोप करत पवार थेट राज्यसभा अध्यक्ष जगदीप धनखड यांची भेट घेतली. पवारांच्या या भूमिकेमुळे ठाकरे गट आणि काँग्रेसच्या मनातील संभ्रम दूर होण्यास मदत होणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. (Latest Political News)

Sharad Pawar, Narendra Modi
Devendra Fadnavis News : संभाजी भिडेंवरुन विरोधकांचा विधानसभेत गदारोळ; फडणवीसांनी ठणकावून सांगितले

राष्ट्रवादीतील बंडानंतरही देशात भाजपविरोधात शरद पवारांनी आपली भूमिका कायम ठेवली होती. दरम्यान, पुण्यातील मोदींच्या व्यासपीठावर पवारांनी जाऊ नये, असे आव्हान महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून केले जात होते, मात्र कार्यक्रम पूर्वनियोजित असल्याने पवार तेथे उपस्थित राहिले. यानंतर जनतेच्या मानत पवारांच्या भूमिकेने संभ्रम झाला असून तो दूर करण्याचे काँग्रेसने आवाहन केले होते.

कार्यक्रमानंतर पवार थेट अधिवेशनासाठी दिल्लीला रवाना झाले. अधिवेशनात विरोधकांनी सुरुवातीपासूनच मणिपूर हिंसाचारावर बोलण्याचा आग्रह धरला आहे. वारंवार मागणी करूनही पंतप्रधान मोदी मणिपूरबाबत सभागृहात निवेदन करत नाहीत. तसेच आता विरोधकांनाही मणिपूरवर बोलण्यास मज्जाव केला जात असल्याचा आरोप पवार आणि काँग्रेसचे अध्यक्ष विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला आहे. याबाबत त्यांनी उपराष्ट्रपती आणि राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांची भेट घेत मोदी सरकारविरोधात ठोस भूमिका घेतली. मणिपूरमधील हिंसाचारच्या प्रकाराकडे सभापती धनखड यांचे लक्ष वेधत त्यांच्यासमवेत राज्यसभेतील कामकाजाबद्दल चर्चा केली.

Sharad Pawar, Narendra Modi
Jalgaon Commissioner News: आयुक्तांविरोधाचा 'अविश्वास' मागे, पण महाजन-पाटलांचे 'टेन्शन' वाढलेलेच ! काय आहे कारण ?

यावेळी मलिकाजुर्न खर्गे यांच्यासह देशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या ३१ पक्षाच्या नेत्यांनी उपराष्ट्रपती आणि राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांची भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळाने त्यांना मणिपूरमधील घटनांची माहिती दिली. त्यासोबतच यावेळी राज्यसभेत चर्चेवेळी मणिपूरच्या मुद्दयावर बोलू दिले जात नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. यात खर्गे यांच्यासह पवारही आघाडीवर होते. यामुळे पुण्यात मोदींचे कौतुक करणारे पवार दिल्लीत जाताच मोदी सरकारविरोधात आपली भूमिका तीव्र केल्याचे दिसून आले.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.