Shashi Tharoor : शशी थरूर यांच्याकडून काँग्रेसच्या जिव्हारी लागणारा सर्वात मोठा घाव; म्हणाले, आताचा भारत हा 1975...

Shashi Tharoor Labels Emergency as a ‘Dark Chapter’ : शशी थरूर यांचा गुरूवारी मल्यालम दैनिक दीपिका या वृत्तपत्रामध्ये लेख प्रसिध्द झाला आहे. त्यामध्ये त्यांनी आणीबाणीवर टीका करताना हा काळ म्हणजे भारताच्या इतिहासातील काळा अध्याय, असे थरूर यांनी स्पष्टपणे म्हटले आहे.
Narendra Modi, Shashi Tharoor, Rahul Gandhi
Narendra Modi, Shashi Tharoor, Rahul GandhiSarkarnama
Published on
Updated on

Congress MP's View at Odds with Party Legacy : मागील काही महिन्यांपासून काँग्रेसचे खासदार शशी थरूर हे मागील काही दिवसांपासून सातत्याने पक्षाच्या भूमिकेशी विपरीत विधाने करताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांनी पक्षातील नेत्यांची नाराजी ओढवून घेतली आहे. आता पुन्हा एकदा त्यांनी थेट जिव्हारी लागणारा सर्वात मोठा घाव केला आहे. त्यांनी 1975 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आणीबाणीच्या निर्णयावर बोट ठेवत विरोधकांच्या हाती आयते कोलित दिले आहे.

शशी थरूर यांचा गुरूवारी मल्यालम दैनिक दीपिका या वृत्तपत्रामध्ये लेख प्रसिध्द झाला आहे. त्यामध्ये त्यांनी आणीबाणीवर टीका करताना हा काळ म्हणजे भारताच्या इतिहासातील काळा अध्याय, असे थरूर यांनी स्पष्टपणे म्हटले आहे. स्वातंत्र्य कशापध्दतीने संपविले जाते, हे 1975 मध्ये सर्वांनी पाहिले. पण आताचा भारत 1975 चा भारत नाही, असेही ते म्हणाले आहेत.

काँग्रेसने मोदी सरकारचा कालखंडामध्ये अघोषित आणीबाणी असल्याची टीका केली होती. एकप्रकारे त्याला छेद देणारी भूमिका थरूर यांनी मांडली आहे. थरूर यांनी लिहिले आहे की, भारताच्या इतिहासातील काळा अध्याय म्हणून आणीबाणीची आठवण काढण्यापेक्षा त्यातून मिळालेला धडा समजून घ्यायला हवा. सुशासन आणि कायदा-सुव्यवस्थेसाठी करण्यात आलेले प्रयत्न अनेकदा क्रुर होतात, त्याचे समर्थन केले जाऊ शकत नाही.

Narendra Modi, Shashi Tharoor, Rahul Gandhi
BJP President Election : भाजप अध्यक्ष निवडीसाठी RSS ने सेट केलाय फॉर्म्यूला? हवाय असा धडाकेबाज नेता...

इंदिरा गांधींचे पूत्र संजय गांधी यांनी जबरदस्तीने नसबंदी मोहिम चालवली, हे त्याचे कुख्यात उदाहरण बनले. मागास ग्रामीण भागात आपले लक्ष्य साध्य करण्यासाठी हिंसा आणि जबरदस्ती करण्यात आली. दिल्लीसारख्या शहरांमधील झोपड्या उद्धवस्त करण्यात आल्या. हजारो लोक बेघर झाले. त्यांच्या पुनर्वसनाकडे लक्ष दिले नाही, असा प्रकार थरूर यांनी केला आहे.

Narendra Modi, Shashi Tharoor, Rahul Gandhi
बदल्यांमध्ये हस्तक्षेप करू नका! महिला जिल्हाधिकाऱ्यांनी थेट मंत्री, खासदार, आमदारांनाच सुनावलं...

लोकशाहीला हलक्यात घेता कामा नये, असे सांगताना थरूर यांनी म्हटले आहे की, लोकशाही हा एक अनमोल वारसा आहे. त्याचे सातत्याने संरक्षण करायला हवे. आजचा भारत 1975 चा भारत नाही. आज आपण अधिक आत्मविश्वासपूर्ण, अधिक विकसित आणि अनेक बाबतीत अधिक मजबूत लोकशाही आहोत, असे थरूर म्हणाले आहेत. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com