Shashi Tharoor News : अदाणी प्रकरणात जेपीसी बाबत पवारांचे लॉजिक योग्यच; पण…थरुर म्हणाले...

Sharad Pawar News : थरूर यांनी शरद पवारांचे जेपीसी बाबतचे लॉजिक योग्य असल्याचे म्हटले आहे.
Shashi Tharoor, Sharad pawar News
Shashi Tharoor, Sharad pawar NewsSarkarnama
Published on
Updated on

Shashi Tharoor, Sharad pawar News : काँग्रेसचे खासदार शशी थरूर (Shashi Tharoor) यांनी अदाणी प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जे वक्तव्य केले त्यावर भाष्य केले. थरूर यांनी शरद पवारांचे (Sharad Pawar) जेपीसी बाबतचे लॉजिक योग्य असल्याचे म्हटले आहे.

काँग्रेस (Congress) आणि इतर विरोधी पक्षांना वाटते आहे की अदाणी प्रकरणात जेपीसीचा उपयोग होईल, असेही थरुर म्हणाले. गौतम अदाणी प्रकरणात जेपीसीबाबत जे वक्तव्य पवार यांनी केले आहे, ते लॉजिकली बरोबर आहे. पवार यांचे म्हणणे आहे की अशा प्रकरणात जेव्हा संयुक्त संसदीय समिती नेमली जाते तेव्हा ५० टक्क्यांहून जास्त सदस्य हे सत्ताधारी पक्षाचे असतात, असे मत त्यांनी मांडले.

Shashi Tharoor, Sharad pawar News
Ahmadnagar Politics : बावनकुळेंचे शिर्डीमध्ये वेगळे संकेत? खासदार विखेंना गाडीवर घेत केले सारथ्य

याचाच अर्थ अदाणी प्रकरणात समिती स्थापन झाली तर ५० टक्केहून जास्त लोक हे भाजपचे (BJP) असतील. तरीही आम्हाला असे वाटते की या सगळ्या प्रकरणात जेपीसी असली पाहिजे. जेपीसी स्थापन झाली तर विरोधकांनाही प्रश्न विचारता येतील. त्यामुळे या प्रकरणातली कागदपत्रे आणि फाईल्सही पाहू शकतो, असे थरूर यांनी म्हटले आहे.

जेपीसीचा जो अधिकार आहे तो आपण वापरला पाहिजे. त्याचा आपल्याला नक्की उपयोग होईल. सरकाने अद्यापही या प्रकरणात जेपीसीला मान्यता दिलेली नाही. मात्र, जी बाब पवार बोलत आहेत ती वेगळी आहे. ६ तारखेला आम्ही विजय चौकापर्यंत गेलो होतो, तेव्हा एनसीपीच्या नेत्यांहनी आम्हाला साथ दिली होती.

Shashi Tharoor, Sharad pawar News
Chandrashekhar Bawankule : बावनकुळेंनी मागितली जाहीर माफी अन् कार्यकर्त्यालाही पक्षातून काढणार...

शरद पवार यांनी शुक्रवारी एनडीटीव्हीला मुलाखतीत दिली. त्या मुलाखतीमध्ये अदाणी प्रकरणात जेपीसी नेमण्याच्या मी पूर्णपणे विरोधात नाही. मात्र, आत्तापर्यंत अनेकदा संयुक्त संसदीय समिती स्थापन झाली. मी सुद्धा जेपीसीचा सदस्य होतो. जेपीसीमध्ये सत्ताधारी पक्षाचे पारडेच जड असते. त्यामुळे बहुमतावरच निर्णय घेतला जात असतो. सर्वोच्च न्यायालयाची समिती ही जास्त प्रभावी ठरेल, असे मला वाटते असे पवार यांनी म्हटले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com