Shashi Tharoor News : शशी थरूर धमाका करण्याच्या तयारीत? पीयूष गोयल यांच्यासोबतचा सेल्फी केला शेअर

Congress Leader Politics Minster Piyush Goyal BJP News : शशी थरूर यांनी नुकताच काँग्रेसला आपल्याकडे पर्याय असल्याचा सूचक इशारा दिला आहे.  
Shashi Tharoor with Piyush Goel
Shashi Tharoor with Piyush Goel Sarkarnama
Published on
Updated on

New Delhi Politics : खासदार शशी थरूर हे काँग्रेसमध्ये नाराज असल्याच्या चर्चांचा जोर आता वाढू लागला आहे. त्यांनीच तसे संकेतही दिले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौऱ्यावरून काँग्रेस टीका करत असताना थरूर यांनी मात्र कौतुक केले होते. त्यानंतर त्यांनी एका मुलाखतीत काँग्रेसवर आगपाखड केली होती.

काँग्रेसमध्ये आपले स्थान काय, माझ्यावर कोणती जबाबदारी आहे, असे प्रश्न थरूर यांनी उपस्थित केले होते. तसेच आपल्याकडे पर्याय असल्याचे सूचक विधानही त्यांनी केले होते. त्यामुळे ते काँग्रेस सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली होती. आता पुन्हा या चर्चांना जोर आला आहे. मंगळवारी थरूर यांनी केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांच्यासोबतचा एक सेल्फी सोशल मीडियात पोस्ट केला आहे.

Shashi Tharoor with Piyush Goel
CAG Report : ‘कॅग’च्या अहवालात केजरीवालांचं पितळ उघडं पडलं; अनेक धक्कादायक खुलासे...

फोटोमध्ये थरूर आणि गोयल यांच्यासोबत ब्रिटनचे वाणिज्य मंत्री जोनाथन रेनॉल्डस हेही आहे. थरूर यांनी म्हटले आहे की, ‘जोनाथन आणि गोयल यांच्यासोबत चांगली चर्चा झाली. ‘एफटीए’बाबत चर्चेला पुन्हा सुरूवात झाली, त्याचे स्वागत करतो.’ थरूर यांनी यामध्ये कोणतेही राजकीय भाष्य केले नसले तरी सध्याच्या त्यांच्याविषयीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर गोयल यांच्यासोबतचा फोटो पोस्ट केल्याने तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत.

दरम्यान, थरूर यांनी मोदींचे कौतुक करण्याबरोबरच केरळमधील पी. विजयन सरकारचेही कौतुक केले होते. त्यानंतर सीपीआय (एम) पक्षाचे नेते थॉमस इसाक यांनीही लगेच थरूर यांना आपल्या पक्षात घेण्यास कोणतीही अडचण नसल्याचे म्हटले होते. आमच्या पक्षाने याआधीही काँग्रेसमधील अनेक नेत्यांना प्रवेश दिला आहे, असेही इसाक यांनी स्पष्ट केले होते.

Shashi Tharoor with Piyush Goel
Shashi Tharoor News : भाजपसाठी शशी थरूर ठरणार सत्तेची चावी? काँग्रेसला 6 वेळा आणलं होतं अडचणीत…

थरूर यांनी नुकतीच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचीही भेट घेतली होती. या भेटीत नेमकी कोणती चर्चा झाली, याची माहिती त्यांनी दिली नव्हती. मात्र, राहुल गांधी त्यांच्यावर नाराज असल्याचे बोलले जाते. मोदींचे कौतुक हे त्यामागचे महत्वाचे कारण असल्याचे सांगितले जात आहे. त्यातच आता थरूर यांच्याकडून एकामागोमाग एक काँग्रेस नेत्यांना दुखावणारी विधाने आणि कृती केली जात आहे.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com