Lok Sabha Election 2024 : महायुतीचे ठरेना! कोल्हापूर, हातकणंगलेचा घोळ दिल्ली दरबारी

Kolhapur Hatkanangale Constituency Shinde Group And Bjp Alliance : कोल्हापुरातील निर्णय मोदी-शाहांच्या दरबारात होणार?
Kolhapur Politics
Kolhapur PoliticsSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur Hatkanangale Lok Sabha Constituency :

कोल्हापूर जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा शिंदे गटाकडेच असतील, अशी घोषणा करत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपच्या दाव्यातील हवा काढून घेतली. मात्र हसन मुश्रीफ यांची ही घोषणा केवळ घोषणाच ठरू शकतो, असा अंदाज राजकीय वर्तुळात वर्तवला जात आहे.

कारण महायुतीपेक्षा भाजपला प्रत्येक जागेसाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत. अब की बार 400 के पार घोषणा दिल्यानंतर PM Modi आणि गृहमंत्री अमित शाहा स्थानिक पातळीवर असा निर्णय घेतील, अशी शक्यता कमीच आहे. त्यामुळे कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाबाबत भाजपचा निर्णय दिल्लीतूनच होऊ शकतो, असा सूर उमटत आहे.

Kolhapur Politics
CM Shinde: मुख्यमंत्री शिंदेंच्या विशेष अधिकाऱ्याचा कर्नाटक सरकारला इशारा; 'कानडी नागरिकांच्या...'

महायुतीच्या रविवारी झालेल्या मेळाव्यानंतर हसन मुश्रीफ यांनी जिल्ह्यातील दोन्ही जागा शिंदे गटाला असतील, असे जाहीर केले. प्रत्यक्षात याच नव्हे तर राज्यातील कोणत्याही जागेबाबत महायुतीचा निर्णय झालेला नाही. या निर्णय प्रक्रियेत कोल्हापूर जिल्ह्याचा विचार करता राष्ट्रवादी काँग्रेसला किती महत्त्व असेल हे सांगता येणार नाही. दुसरीकडे जागा जरी शिंदे गटालाच मिळाल्या तरी उमेदवारी विद्यमान खासदारांनाच मिळेल की नाही? याविषयीही संभ्रमावस्था आहे.

लोकसभेची निवडणूक भाजपच्यादृष्टीने प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे एका एका जागेवरील विजयाची आखणी करताना अनेक बाजूंनी विचार केला जाणार आहे. त्यामुळे जागा कोणाला मिळणार यापेक्षा विद्यमान खासदारांना उमेदवारी मिळवणे हेच मोठे आव्हान असेल. वरिष्ठ पातळीवरून मिळालेल्या संकेतानुसार दोन्ही खासदारांच्या कामाविषयी नकारात्मक मत आहे. त्यामुळे जागा जरी शिंदे गटाला मिळाली तरी विद्यमान खासदारांनाच उमेदवारी मिळेल? हे सांगणे अवघड आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिंदे गटाच्या दोन्हीही विद्यमान खासदारांचे मौन

महायुतीत जोपर्यंत जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित होत नाही, तोपर्यंत इच्छुक उमेदवारांनी मौन बाळगले आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक हे दावेदार असले तरी सध्या लोकसभेबाबत अजून कोणतेही स्टेटमेंट त्यांच्याकडून आलेले नाही. त्यांच्या मुलाच्या विवाह समारंभात त व्यग्र असल्याने त्यांनी वक्तव्य केले नसल्याचेही सांगण्यात येते. त्यानंतर त्यांच्या हालचालींना वेग येईल, असेही सांगितले जात आहे.

दुसरीकडे हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार धैर्यशील माने यांनीही लोकसभेबाबत आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्यानंतर तेही सक्रिय होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. शिंदे गटाच्या सात खासदारांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली असल्याचा आरोप आमदार सतेज पाटील यांनी केला होता. तसे असेल तर कोल्हापुरातील दोन्हीही लोकसभेचे उमेदवार हे भाजपच्या तिकिटावर उभारणार का? असा सवालही उपस्थित होत आहे. त्यामुळे मुश्रीफ यांनी केलेल्या घोषणेला किती महत्त्व आहे? हे अभ्यासणे गरजेचे आहे.

edited by sachin fulpagare

Kolhapur Politics
Sambhajiraje : लोकसभेला संभाजीराजेंना आघाडीचे पाठबळ? कोल्हापूरसाठी असा आहे मास्टर प्लॅन...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com