Balasaheb Thackeray : काँग्रेसने अखेर बाळासाहेब ठाकरे यांचा..! मिलिंद देवरांचा 12 वर्षांनंतर गौप्यस्फोट

Milind Deora Rahul Gandhi Congress : राहुल गांधी यांनी सोशल मीडियात पोस्ट करत बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवानद केले आहे.
Milind Deora
Milind DeoraSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : शिवसेवाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरून महाविकास आघाडी विरुध्द महायुती असा सामना रंगला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आव्हानानंतर काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी प्रत्युत्तर दिले आणि रविवारी राहुल गांधी यांनी सोशल मीडियातून बाळासाहेब ठाकरेंच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन केले. त्यानंतर आता शिवसेनेचे खासदार मिलिंद देवरा यांनी 12 वर्षांनंतर मोठा गौप्यस्फोट केला आहे.

मिलिंद देवरा यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेस सोडचिठ्ठी देत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर ते राज्यसभेचे खासदार झाले. आता वरळी विधानसभा मतदारसंघातून ते आदित्य ठाकरे यांच्याविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. काँग्रेसमध्ये असताना ते केंद्र सरकारमध्ये मंत्रीही होते.

Milind Deora
Delhi Assembly Election : मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर काही मिनिटांतच केजरीवालांचा भाजपला ‘दे धक्का’; दिल्लीत फोडाफोडी तेजीत

राहुल गांधी यांनी सोशल मीडियातून बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केल्यानंतर देवरा यांनीही सोशल मीडियातून गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, अखेर काँग्रेसने 12 वर्षांनंतर बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा मान्य केला, त्याचे मी स्वागत करतो. 2012 मध्ये मी मुंबईतून केंद्रीय मंत्री या नात्याने UPA ने बाळासाहेबांच्या स्मरणार्थ एक दिवस राष्ट्रीय शोक जाहीर करावा, असा प्रस्ताव मांडला होता.

तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा या प्रस्तावाला पाठिंबा होता, पण आघाडीमधील काही घटकांनी हा प्रस्ताव रोखला होता, असे दावा देवरांनी केला आहे. दरम्यान, आता देवरा यांच्या या दाव्यानंतर त्याला काँग्रेसकडून कसे प्रत्युत्तर दिले जाणार, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

Milind Deora
Rahul Gandhi : बाळासाहेब ठाकरेंविषयी मोदींकडून आव्हान; पुण्यतिथीनिमित्त राहुल गांधींची पोस्ट चर्चेत

राहुल गांधी यांनी ट्विट करत बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले आहे. तसेच आपण उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि शिवसेनेसोबत असल्याचेही राहुल यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. त्याआधी शनिवारी प्रियांका गांधी यांनीही शिर्डी येथील सभेत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान दिले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com