Shocking Incident : धक्कादायक! कबर खोदून बहिणीचा सांगाडा आणला थेट बँकेत; भावाचा हा निर्णय पाहून पोलीसही चक्रावले

brother digs grave to bring sister skeleton to bank : बँकेच्या कठोर अटीमुळे भावाला बहिणीची कबर खोदून सांगाडा बँकेत आणावा लागला. वाचा ही धक्कादायक आणि भावनिक खरी घटना.
Shocking Incident : धक्कादायक! कबर खोदून बहिणीचा सांगाडा आणला थेट बँकेत; भावाचा हा निर्णय पाहून पोलीसही चक्रावले
Published on
Updated on

धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. बँकेच्या नियमांमुळे एका भावाला आपल्या मृत बहिणीचा सांगाडा थेट बँकेत आणण्याची वेळ आली. या घटनेमुळे ओडिशासह संपूर्ण देशभरात रोष व्यक्त केला जात आहे. माणुसकीला आणि व्यवस्थेला तफावत पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे.

ओडिशातील केओंझार जिल्ह्यातील दियानाली गावात राहणारा जितू मुंडा (50) आपल्या बहिणीच्या खात्यातील 20,000 रुपये काढण्यासाठी स्थानिक बँकेत गेला होता. त्याची बहीण कालरा मुंडा (56) हिचं निधन 26 जानेवारी 2026 रोजी झालं होतं. बहिणीच्या निधनानंतर तिच्या खात्यातील पैसे काढण्यासाठी जितूने अनेकदा बँकेच्या फेऱ्या मारल्या,मात्र पैसे मिळाले नाही.

Shocking Incident : धक्कादायक! कबर खोदून बहिणीचा सांगाडा आणला थेट बँकेत; भावाचा हा निर्णय पाहून पोलीसही चक्रावले
A G Perarivalan : राजीव गांधी हत्या प्रकरणातील आरोपी बनला वकील; थेट हायकोर्टात लढवतोय केस, फाशीच्या शिक्षेतून झालीय सुटका...

बँकेच्या अधिकाऱ्यांनी खातेदार स्वतः उपस्थित राहण्याची अट घातली. जितूने बहिणीचा मृत्यू झाल्याचं सांगूनही त्यावर विश्वास ठेवला गेला नाही. त्याला मृत्यू प्रमाणपत्र आणि वारसा हक्काची कागदपत्रे आणण्यास सांगितले गेले. मात्र आदिवासी पार्श्वभूमीमुळे त्याच्याकडे अशी कोणतीही कागदपत्रे नव्हती.

वारंवार होणाऱ्या नकारामुळे आणि अपमानामुळे हतबल झालेल्या जितूने अखेर टोकाचा निर्णय घेतला. त्याने बहिणीची कबर खोदून तिचा सांगाडा बाहेर काढला आणि तो खांद्यावर घेऊन थेट बँकेत पोहोचला. हा प्रकार पाहून बँकेत एकच खळबळ उडाली. उपस्थित लोकही हादरले.

Shocking Incident : धक्कादायक! कबर खोदून बहिणीचा सांगाडा आणला थेट बँकेत; भावाचा हा निर्णय पाहून पोलीसही चक्रावले
Rini Sampath : अमेरिकेच्या सत्तेच्या केंद्रस्थानी आता भारतीय चेहरा; कोण आहेत महापौरपदाच्या रिंगणात उतरल्या भारतीय वंशाच्या रिनी संपत?

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com