Teacher Attack : काळजाचा ठोका चुकवणारा प्रकार! शिक्षिकेवर 30 सेकंदात 30 सपासप वार; धक्कादायक थरार कॅमेऱ्यात कैद

Teacher assault caught on camera : अवघ्या ३० सेकंदांत शिक्षिकेवर ३० वार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून घटनेने खळबळ उडाली आहे.
School teacher attack latest news
School teacher attack latest newsAI Generated image
Published on
Updated on

हरियाणातील फरिदाबाद येथे एका खासगी शाळेत घडलेल्या भीषण हल्ल्याने संपूर्ण परिसर हादरला आहे. सकाळी शाळेच्या वेळेत एका तरुणाने शिक्षिकेवर भरदिवसा चाकूने सपासप वार करून तिची निर्घृण हत्या केली. अवघ्या 30 सेकंदांत 30 हून अधिक वार झाल्याचा दावा समोर आला असून, संपूर्ण थरार शाळेतील CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपीला काही तासांत अटक केली आहे.

मास्क घातलेला एक तरुण शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत आला. त्याने संबंधित शिक्षिकेबद्दल चौकशी केली आणि त्यांना भेटायचे असल्याचे सांगितले. शिक्षिका बाहेर आल्यानंतर त्याने अचानक त्यांचा गळा पकडला आणि शाळेच्या गेटबाहेर ओढत नेत चाकूने जीवघेणा हल्ला सुरू केला. चेहरा, मान आणि छातीवर त्याने एकामागून एक वार केले. शिक्षिका जमिनीवर कोसळल्यानंतरही आरोपी थांबला नाही. उलट त्याने त्यांच्या पोटावर आणि चेहऱ्यावर पुन्हा अनेक वार केल्याचे CCTV फुटेजमध्ये दिसून आले आहे.

School teacher attack latest news
CJP meeting : कॉक्रोच जनता पार्टीची राजकारणात एन्ट्री होणार? अभिजीत दीपकेंनी बोलविलेल्या महत्वपूर्ण बैठकीत ठरणार 'रोडमॅप'

घटनेदरम्यान आरडाओरड ऐकून शाळेतील कर्मचारी आणि प्रशासक घटनास्थळी धावले. त्यांनी आरोपीला रोखण्याचा प्रयत्न केला असता त्याने त्यांच्यावरही चाकू उगारत धमकावले. त्यामुळे काही क्षण गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर आरोपी नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीवरून घटनास्थळावरून पसार झाला.

घटनेविषयी बोलताना शाळा प्रशासक म्हणाले, “सकाळी साडेनऊच्या सुमारास मी माझ्या ऑफिसमध्ये बसलो असताना बाहेर कॉरिडोअरमधून ओरडण्याचा आवाज आला. मी बाहेर येऊन पाहिलं तर ती जमिनीवर पडली होती आणि एक माणूस तिच्यावर वारंवार चाकूने वार करत होता.”

जखमी शिक्षिकेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर पोलिसांनी वेगाने तपास सुरू करत अवघ्या 2 तासांत 21 वर्षीय आरोपी अमित याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.

School teacher attack latest news
Top 10 News : सुनेत्रा पवारांनी शोधल्या रुपाली चाकणकरांच्या उत्तराधिकारी ; एकनाथ शिंदे मोठा दणका देणार, 4 मंत्री 'डेंजर झोन'मध्ये; वाचा महत्त्वाच्या टॉप 10 घडमोडी!

प्राथमिक तपासात आरोपीची आणि मृत शिक्षिकेची दोन वर्षांपूर्वी ओळख झाल्याचे समोर आले आहे. आरोपी सातत्याने तिच्याशी संपर्क साधण्याचा आणि पाठलाग करण्याचा प्रयत्न करत होता. शिक्षिकेने त्याला वारंवार नकार दिल्यानंतर त्याच्याविरुद्ध छेडछाडीची तक्रारही दाखल केली होती. त्यावेळी आरोपीने माफी मागितली होती. मात्र, त्या तक्रारीचा राग मनात ठेवून सूडाच्या भावनेतून त्याने हा हल्ला केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या धक्कादायक हत्याकांडामुळे महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com