SIR News : निवडणूक आयोगाकडून एसआयआर(SIR) मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेदरम्यान, माजी पंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, विदेशमंत्री एस जयशंकर, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्यासह निवडणूक आयुक्त एसएएस संधू यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांना निवडणूक आयोगाकडे नोटीस बजावण्यात आल्याचे समोर आले आहे.
मतदार यादीमध्ये तफावत तसेच जुन्या लिंक नसल्याने नोटीस या नेत्यांना नोटीस दिली असल्याची माहिती आहे.
दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया, CBI डायरेक्टर प्रवीण सूद, माजी सेना प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी तसेच माजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश रंजना देसाई यांच्या अनेक माजी अधिकाऱ्यांना देखील नोटीस देण्यात आली आहे. त्यामुळे नोटीस मिळालेल्या नेते, माजी अधिकारी यांचे नाव मतदार यादीतून कट होणार असल्याची चर्चा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विदेश मंत्री एस जयशंकर आणि त्यांची पत्नी यांना अंतिम एसआयआरच्या वर्गीकरण 'अनमॅप्ड' असे केले आहे. याचा अर्थ असा की, त्यांची सध्याची मतदार नोंद २००२ मध्ये तयार केलेल्या मागील एसआयआर मतदार यादीतील संबंधित नोंदींशी लिंक झाली नाही. सीबीआय डायरेक्टर प्रवीण सूद, त्यांची पत्नी वनिता सूद आणि त्यांची आई कमलेश यांचा देखील याचा कॅटेगिरीमध्ये ठवण्यात आले आहे.
माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, त्यांची मुलगी प्रतिभा अडवाणी आणि सून गीतिका अडवाणी यांही नोंद मागील मतदार यादीशी लिंक नसल्याने त्यांना नोटीस मिळाली आहे. लालकृष्ण अडवाणी हे 2002 मध्ये गृहमंत्री होते तेव्हा शेवटची विशेष मतदार यादी (SIR) घेण्यात आली होती.
एसआयआरमध्ये अनेक मतदारांची नावे यादीशी जुळत नसल्याचे देखील सांगितले जात आहे. त्यात प्रामुख्याने स्पेलिंग चूक दाखवत असल्याची माहिती आहे. मनिष सिसोदीया यांना पाठवलेल्या नोटीसमध्ये ठोस कारण सांगितलेले नाही. मात्र, नाव अचूक नाही, असे म्हटले आहे. तर त्यांचा मुलगा मीर सिसोदिया यांचा वडीलांचे नाव मिसमॅच असल्याने नोटीस देण्यात आली आहे.
मिडिया रिपोर्टनुसार, नोटीसमागील मुख्य कारणे म्हणजे एसआयआर रेकॉर्डमध्ये नावात आढळून आलेली विसंगती, नावाच्या स्पेलिंगमध्ये तफावत, माहिती न जुळणे, जुन्या रेकॉर्डसोबत नाव न जुळणे आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.